उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रेझिंगडे सप्ताह; ३, ८०, ००० मोबाईल नागरिकांना परत
By सदानंद नाईक | Published: January 9, 2024 04:55 PM2024-01-09T16:55:50+5:302024-01-09T16:55:58+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोमवारी रेझिंगडे सप्ताह संपन्न झाला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी यांनी पोलिसांच्या १०० नंबर बाबत माहिती दिली
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोमवारी रेझिंगडे सप्ताह संपन्न होऊन पोलिसांनी चोरी गेलेले ३ लाख ८० हजाराचे मोबाईल नागरिकांना यावेळी परत केले. तसेच मोबाईल चोरी बाबत सहायक पोलीस आयुक्त अनिल कोळी यांनी नागरिकांना माहिती दिली.
उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोमवारी रेझिंगडे सप्ताह संपन्न झाला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी यांनी पोलिसांच्या १०० नंबर बाबत माहिती दिली. तसेच ११२ नंबर नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचा असून या नंबरवर पोलीस ठाण्यात उपस्थित न राहता तक्रार करू शकतात. असे सांगून पोलीस या नंबरवरील तक्रारीवरून गुन्हा दाखल करू शकतात. अशी माहिती कोळी यांनी दिली. चोरीला गेलेले ३ लाख ८० हजार किंमतीचे मोबाईल पोलिसांनी यावेळी नागरिकांना परत केली. याव्यतिरिक्त मुलांना सायबर क्राईम गुन्हे, पोलीस ठाण्यातील लॉकअप, शस्त्राची माहिती, सोशल मीडिया आदींची माहिती यावेळी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली आहे.