लोकमान्य, वागळे आणि मुंब्य्रातील वाढते रुग्ण, पालिकेला ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:19 PM2020-05-15T17:19:13+5:302020-05-15T17:22:13+5:30

लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेट, मुंब्रा पटयात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर कसे उपाय योजावेत असा पेच पालिकेला पडला आहे. येथील रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५४० च्या पार गेली आहे.

Rising number of patients in Lokmanya, Wagle and Mumbai is a headache for the municipality | लोकमान्य, वागळे आणि मुंब्य्रातील वाढते रुग्ण, पालिकेला ठरतेय डोकेदुखी

लोकमान्य, वागळे आणि मुंब्य्रातील वाढते रुग्ण, पालिकेला ठरतेय डोकेदुखी

Next

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु असे असले तरी आता ठाण्यातील लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि मुंब्य्रात रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकमान्य आणि वागळे इस्टेट हा पटटा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असले तरी या भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमान्य नगर भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २०० च्या पार झाली आहे. तर वागळे इस्टेट भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही पावणे दोनशे आणि मुंब्य्राची संख्या ही १५० च्या घरात आली आहे. येथील परिसर हा संपूर्णपणे झोपडपटटीचा असल्याने त्यावर उपाय योजना कशा करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.
               ठाणे शहराचा आजचा विचार केला तर या तीनही प्रभागात मिळून तब्बल ५४० च्या आसपास रुग्ण हे कोरोना बाधीत झाल्याचे दिसून आले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात या भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही कमी होती, मात्र मागील १५ दिवसात या भागात रुग्णांची संख्या ही गुणाकाराने वाढतांना दिसत आहे. लोकमान्य नगर भागात तर रोज नवीन १० ते २० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही संख्या कमी कशी करायची कोणत्या उपाय योजना करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. आजच्या घडीला या भागात २३० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तिकडे वागळे इस्टेट भागातही कोरोनाचे १६७ हून अधिक रुग्ण आहेत. तसेच मृत्यु पावलेल्यांमध्येही याच पटटातील नागरीकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. हा भाग पूर्णपणे दाटीवाटीचा आणि गर्दीचा भाग आहे. घराला लागून घरे असून झोपडपटटीने हा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने होताना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसापूर्वी लोकमान्य नगर आणि वागळे प्रभाग समितीमधील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असतांनाही आता या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आजही नागरीक सर्व सेवा बंद असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत आहेत. पालिका आणि पोलीसांकडून देखील नागरीकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. दुसरीकडे मागील काही दिवस मुंब्य्रातील कोरोनाबाधीतांची संख्या ही कमी वाटत होती. मात्र मागील चार ते पाच दिवसात पुन्हा येथील रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या १० प्रभाग समितीत मिळून ९१३ रुग्ण असून आतापर्यंत पावणे तीनशे रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. परंतु असे जरी असले तरी शिल्लक राहिलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधीक रुग्ण हे लोकमान्य नगर, वागळे आणि मुंब्य्रात ५३४ हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
 

Web Title: Rising number of patients in Lokmanya, Wagle and Mumbai is a headache for the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.