मोरीवली आणि वडवली गावाला रासायनिक प्रदुषणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 06:45 PM2020-09-29T18:45:54+5:302020-09-29T18:46:00+5:30

दोन्ही गावात रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वायुचे प्रमाण येवढे वाढलेले असते की हा संपूर्ण परिसत धुरात साडपल्याचा भास होतो.

Risk of chemical pollution to Morivali and Vadavalli villages | मोरीवली आणि वडवली गावाला रासायनिक प्रदुषणाचा धोका

मोरीवली आणि वडवली गावाला रासायनिक प्रदुषणाचा धोका

googlenewsNext

अंबरनाथ  : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पध्दतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे. या रासायनिक प्रदुषणाचा फटका या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. दररोज विषारी धुर आणि वायू हेवत सोडण्याचे प्रकार वाढत असल्याचे बाब दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या महिन्यात अंबरनाथ वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखाण्यातुन मोठय़ा प्रमाणात धुर सोडण्यात आला होता. त्यामुळे संपरूण अंबरनाथ भागातील साई सेक्शन, कानसई सेक्शन, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसातील नागरिकांना त्याचा त्रस सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळेत रासायनीक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असतांना आता नव्याने खातक आणि त्रसदायक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहे. मोरीवली गावाच्या परिसरात असलेल्या केमिकल झोनमधील काही कारखानदार चुकीच्या पध्दतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करित असल्याचा आरोप मोरीवलतील ग्रामस्थांनी केला आहे. दरुगधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आता या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. हीच परिस्थीत वडवली भागात देखील झाली आहे. मात्र त्या ठिकाणी देखील नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. या दोन्ही गावात रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वायुचे प्रमाण येवढे वाढलेले असते की हा संपूर्ण परिसत धुरात साडपल्याचा भास होतो. येवढय़ा मोठय़ा प्रमाणात विषारी वायू सोडले जात असल्याने त्या कारखारांना समज देण्याची मागणी मोरीवलीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
 

Web Title: Risk of chemical pollution to Morivali and Vadavalli villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.