माळशेजमध्ये धुक्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:29 AM2017-08-08T06:29:15+5:302017-08-08T06:29:15+5:30

अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली.

 The risk of fog in the Malsege | माळशेजमध्ये धुक्याचा धोका

माळशेजमध्ये धुक्याचा धोका

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली. मात्र, धुक्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. दिवसादेखील समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे हेडलाईटचा वापर करावा लागत आहे. चालकांना समोरच्या वाहनाच्या अंदाजाने घाट पार करण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
हेड लाईटचा प्रकाश प्रखर असतानाही या दाट धुक्यांमध्ये तो मंदावलेला आहे. बहुतांशी वाहनासाठी लाल लाईटचा वापरण्यात येतात. मात्र, घाटातील धुक्यांमध्ये ते काम करीत नाहीत. त्या प्रकाशात दिवसाही समोरचे दिसत नसल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्री तर जीव मुठीत घेऊन या घाटातील धुक्यांमधून प्रवास करावा लागत असल्याच्या गंभीर समस्येस चालकांना भेडसावतेय. या दाट धुक्यांच्या अंधारात पिवळे लाईट उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्या प्रखर प्रकाशामुळे धुक्यांचा अंधार चिरून चालकांना काही अंशी रस्त्याचा भाग दिसत आहे. पण सध्या माळशेज घाटातील वाहन चालकास पुढच्या वाहनाचा आधारावर घाटातून प्रवास करावा लागत असल्याचे चालकांकडून सांगितले जात आहे.
यंदा दरडी कोसळल्या नाहीत. पण पावसाचा जोर पाहून वाहतूक बंद करावी लागली. तर पर्यटकांनादेखील घाटात जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, आता पाऊस काही अंशी कमी होऊन दरड कोसळण्याचे संकट टळले. पण दाट धुक्यांचा अंधार जीवघेणा ठरत आहे. याशिवाय उंच कड्यावरून ओहळाच्या पाण्याची धार रस्त्यावर पडत आहेत. त्याखालून वाहनेदेखील जात असून त्यांच्या टपावर पाण्याची धार आदळत आहे.
कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांच्याशी या समस्ये विषयी चर्चा केली असता धुक्याच्या समस्येवर पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. पण रस्त्यांच्या ठिकठिकाणी, वळणावळणांवर पांढरे पट्टे, पिवळे फ्लॅश बोर्ड, पट्टे, सूचनाफलक, धोक्याचे वळण दर्शवणारे बोर्ड मोठ्याप्रमाणात लावले आहेत. घाटात सुरक्षा गार्ड, पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे. क्रेन वाहनही ठिकठिकाणी असल्याचे नाग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रवासाची धास्ती

घाटमार्गात जवळपास १३ ठिकाणी छोट्या दरडी गेल्या वर्षी कोसळल्या होत्या. त्यातून तेल वाहतूक करणारा ट्रक पडला होता. त्याच्या चालकाचा शोध अद्यापही लागलेला नाही. क्लिनरचा मृतदेह चार दिवसांनी सापडला होता. आताही धुक्याचा अंधार घाटातील प्रवासाला घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:  The risk of fog in the Malsege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.