चिरव गावातील नदी पडली कोरडी; ग्रामस्थांसह जनावरे तहानलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:41 AM2019-06-04T00:41:46+5:302019-06-04T00:42:00+5:30
मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.
वसंत पानसरे
किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी घसरली असून, उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चिरव गावामधून बारमाही वाहणारी नदी कोरडी पडल्याने, परिसरातील रहिवाशांसह मुक्या जीवांचीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.
मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाºया चिरव येथील नदी कोरडी पडली असून नदीच्या पात्रात पाण्याऐवजी दगडधोंडेच दिसत आहेत. चिरव नदीला १२ महिने पाणी असते. या नदीच्या पाण्यावरच शेती व शेती दुय्यम पीक घेऊन ग्रामस्थ उदरनिर्वाह चालवतात. शेतीसाठी आणि पिण्यासाठी या नदीपात्रातून ग्रामस्थ पाणी वापरतात. परंतु, यावेळी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांसह जनावरांचीदेखील परवड होत आहे.
खराडे धरणाचे पाणी न सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. या नदीवर चांग्याचापाडा, अंबरपाडा, वेहळोली, चिरव, आष्टे, कानवे, चेरवली यासारख्या अनेक गावपाड्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.
वर्षभर वाहणारी चिरव नदी कोरडी पडली आहे. शेतकऱ्यांनी नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. धरणातून लवकरात लवकर नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. - संतोष चंदे, शेतकरी