वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 03:35 PM2019-07-28T15:35:33+5:302019-07-28T15:36:42+5:30

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.

The river Valdhuni rises to the city, the village wall collapses in near ambarnath | वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

Next
ठळक मुद्देवांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.

अंबरनाथ - तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्‍याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता, हे धरण रेल्‍वे प्रशासनाच्या अखत्‍यारीत येत असल्‍याने नागरिकांनी याविषयी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांना व रहिवाशांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी संरक्षण भिंतीला तडे गेल्‍याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सध्या आजुबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरुन शहरांना मोठा घोका निर्माण झाला आहे.
 

Web Title: The river Valdhuni rises to the city, the village wall collapses in near ambarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.