ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी 

By अजित मांडके | Published: July 19, 2023 10:48 AM2023-07-19T10:48:09+5:302023-07-19T10:48:16+5:30

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६.५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे.

Rivers in Thane and Raigad districts have reached water warning level | ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी 

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी 

googlenewsNext

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील बदलापूर येथील उल्हास आणि टिटवाळा येथील काळू  तसेच जांभळूपाडा येथून वाहणाऱ्या उल्हास या नदीच्या पातळीत वाढ झाल्याने त्या नद्यांच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे.        

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६.५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. १७.५० मीटर ही धोकादायक पातळी आहे. तसेच टिटवाळा येथून वाहणाऱ्या काळू नदीची आजची पातळी १०२.२० मीटर आहे. इशारा पातळी १०२.०० मीटर रतकी आहे. तर धोका पातळी ही १०३.५० मीटर दर्शविण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील जांभूळ पाडा येथून वाहणाऱ्या नदीची आजची पातळी १३.३० मीटर आहे. इशारा पातळी १३.०० मीटर आहे तर धोका पातळी १४.०० मीटर दर्शवली आहे. या आजच्या पातळीवरून दोन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याने इशारा पातळी गाठल्याचे ठाणे पाटबंधारे मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Rivers in Thane and Raigad districts have reached water warning level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.