रियाजची हत्या कशाने? पोलीस संभ्रमात : गोळीबार झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:55 AM2017-12-19T01:55:12+5:302017-12-19T01:55:22+5:30
हुक्का पार्लरला विरोध दर्शवणारा रिक्षाचालक रियाज शेख याच्यावर मारेक-यांनी गोळीबार केला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला, असे मारेक-यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मारेक-यांनी बंदुकीचा वापर केला होता का, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.
कल्याण : हुक्का पार्लरला विरोध दर्शवणारा रिक्षाचालक रियाज शेख याच्यावर मारेकºयांनी गोळीबार केला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला, असे मारेकºयांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मारेकºयांनी बंदुकीचा वापर केला होता का, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.
पूर्वेतील कचोरे येथील शर्मा चाळीच्यासमोर हुक्का पार्लर सुरू करण्याच्या प्रयत्नात साजिद सय्यद होता. शेखने त्यास विरोध केला होता. शुक्रवारी रियाज व साजिद यांच्यात झालेली वादावादी टिळकनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोचली. पोलिसांनी या दोघांवर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे नोंदवले. त्यांतर शनिवारी सायंकाळी रियाजची हत्या झाली.
रियाजच्या हत्येची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली त्याची पत्नी निलोफर हिने साजिदने रियाजवर गोळी झाडल्याचा आरोप केला आहे. तर मारेकºयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रियाजनेच कट्टा आणि तलवार वापरली आहे. रियाजने केलेल्या हल्ल्यात इरफान याच्या उजव्या हाताला जखम झाली. तर दुसरीकडे रियाजच्या शरीरात गोळी घुसल्याचेही डॉक्टरांनी नाकारले. मात्र, गोळी कपाळाला घासून गेल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्यामुळे त्याच्या कपाळाचा काही भाग तांत्रिक तपासणीकरता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गंभीर गुन्ह्यांची नोंद-
रियाज शेख हा ‘मेंटल’ नावानेही ओळखला जात होता. कल्याणचे बाजारपेठ पोलीस ठाणे, उल्हासनगरचे हिललाइन पोलीस ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. दागिने लुटण्यात हातखंडा असलेला रियाज सध्या जामिनावर मुक्त होता. हल्ल्याच्या वेळी त्यानेही शस्त्र बाळगले असल्याची जबानी आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी दिली.