अंबरनाथमध्ये रास्ता, रेल रोको, शहरातील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:25 AM2018-01-04T06:25:08+5:302018-01-04T06:25:13+5:30

प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते.

 Road to Ambernath, Rail Roko, Junk of the city | अंबरनाथमध्ये रास्ता, रेल रोको, शहरातील व्यवहार ठप्प

अंबरनाथमध्ये रास्ता, रेल रोको, शहरातील व्यवहार ठप्प

Next

अंबरनाथ - प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते.
बुधवारी सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरु वात झाली. शहरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी चौकातून घोषणाबाजी करत आंदोलकांनी रेल्वेस्थानकात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही काही संतप्त आंदोलकांनी रेल्वे रु ळांवर उतरून घोषणाबाजी सुरू केली. संतप्त भीमसैनिकांनी सकाळी १० वा.च्या सुमारास फलाट क्र मांक-३ वर बदलापूरच्या दिशेने अंबरनाथकडे येणारी लोकल काही काळ अडवून धरली. नंतर, पोलिसांनी आंदोलकांना शांत केले व रेल्वेमार्गातून बाजूला काढल्यानंतर लोकल कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. यानंतर, आंदोलकांनी घोषणाबाजी करत नगरपालिका कार्यालयाजवळून जाणाºया कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठाण मांडले व रस्ता रोखून धरला. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याने शाळांना सुटी देण्यात आली होती. रेल्वे फलाटांवरील उपाहारगृहे मध्यरात्रीनंतर बंद ठेवण्यात आली असल्याने बाहेरगावच्या गाड्यांमधील प्रवाशांचे व त्या उपाहारगृहांवर अवलंबून असलेल्यांचे हाल झाले. आजच्या बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
श्यामदादा गायकवाड, कबीर गायकवाड, अजय जाधव, धनंजय सुर्वे, महेश तपासे, कमलाकर सूर्यवंशी, सत्यजित गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
बंदच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून झोन-४ मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस यांच्यासह मुख्यालयातून पोलिसांची एक हजारांची जादा कुमक मागवण्यात आली होती. आंदोलन शांततेत झाले.

बदलापुरात आंदोलकांचा राडा

बदलापूर : बुधवारच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये महिला पोलीस कर्मचारी राजश्री नवाळे जखमी झाल्याने पोलिसांनी मोर्चेकºयांवर सौम्य लाठीहल्ला केला. बंदचे परिणाम पहाटेपासूनच दिसायला सुरुवात झाली होती.
बदलापुरात सकाळी ९ वा.च्या सुमारास पश्चिमेकडील उड्डाणपुलाजवळ रिक्षा रोखणाºया कार्यकर्त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करत असताना नवाळे या महिला पोलीस जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यावर हल्ला करणाºया चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, आंदोलकांनी पश्चिमेतील सहकार हॉटेलसमोर गोंधळ घालत कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केल्याने नाइलाजास्तव त्या चार कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. त्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. पश्चिमेतून निघालेला मोर्चा पूर्वेतून घोरपडे चौकातून पुन्हा पश्चिमेत दाखल झाला, त्या वेळी उड्डाणपुलावर मोर्चेकºयांनी ठिय्या मांडला.
दरम्यान, कर्जत महामार्ग आंदोलनामुळे तासभर ठप्प होता. परगावातून येणारी वाहने, ट्रक यांना त्याचा मोठा फटका बसला. बंद आणि मोर्चाचे वृत्तांकन करत असलेल्या प्रसिद्धिमाध्यमाच्या प्रतिनिधींनाही कात्रप येथे मोर्चेकºयांनी धक्काबुक्की केली. यामुळे मोर्चेकरी व पत्रकार यांच्या वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.
सलग दोन दिवस दलित संघटनांनी शहर बंद केल्याने नागरिक, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. रिक्षा, बस, खाजगी वाहने जबरदस्तीने बंद केली जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या बंदमुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. एरवी वाहनांनी गजबजणारे रस्ते बंदमुळे ओस पडलेले होते. वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Road to Ambernath, Rail Roko, Junk of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.