रस्ता खचल्याने वाहतूक केली बंद; दीड महिन्यापासून परिस्थिती जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:16 AM2020-02-28T00:16:33+5:302020-02-28T00:16:36+5:30
मुंबई पालिकेची जलवाहिनी जाते जवळून;
आसनगाव : मागील दीड महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन जवळचा रस्ता खचला असून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला आहे, मात्र तो सुस्थितीत नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मुंबई पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहापूर - तानसा - अघई रस्त्यावर पालिकेच्या पाइपलाइन जवळच्या रस्त्याचा स्लॅब ड्रेन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी रस्ता काढण्यात आला आहे. परंतु पर्यायी रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या रस्त्यावरून गुजरात ते नाशिक अशी जड वाहनांची वाहतूक होत असल्याने हा स्लॅब खचला, असल्याचे समजते.
पाइपलाइनच्या रस्त्यावर ही वाहतूक सोडणे चुकीचे असताना ती सोडली कशी जाते ? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटूनही काम केलेले नाही.
सातत्याने वाहनांची ये-जा या मार्गावर रोज शेकडो वाहने धावतात. हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. हा रस्ता मुंबई- नाशिक, मुंबई गुजरात या रस्त्याला जोडणारा आहे.
दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे जड वाहतूक या रस्त्यावरून करणे योग्य नाही. हा रस्ता मुंबई पाकिकेच्या मालकीचा असल्याने त्याची देखभाल दुरु स्तीची जबाबदारीही त्यांची आहे.