उड्डाणपुलावरील रस्त्याची झाली चक्क एका रात्रीत दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:26 AM2017-10-06T01:26:53+5:302017-10-06T01:28:19+5:30
बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणा-या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी
बदलापूर : बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणा-या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी प्रशासनाला देताच एका रात्रीत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. स्वत: नगराध्यक्ष रात्री रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते.
बदलापूरमधील अनेक रस्ते हे काँक्रिटचे झाल्याने शहरातील खूप कमी रस्ते आता डांबरी राहिले आहेत. या डांबरी रस्त्यांची स्थिती खराब असल्याने त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. पावसाळा संपताच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेश नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दिले होते. त्यानुसार, डांबर प्लांट सुरू होताच बदलापूरमधील सर्वात आधी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.
उड्डाणपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आधी घेण्यात आले. या रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतल्याचे कळताच स्वत: नगराध्यक्ष हे आपल्या कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी करण्यासाठी रात्री पुलावर गेले होते. कामगारांना कामाचा दर्जा योग्य ठेवण्याचे आणि अधिका-यांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. नगराध्यक्ष रात्री काम पाहण्यासाठी आल्याने अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली.