रस्त्यावरील खड्डे व मेट्रोचे काम भिवंडीकरांसाठी ठरतेय डोकेदुखी; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 04:00 PM2021-08-28T16:00:53+5:302021-08-28T16:01:12+5:30

खड्ड्यांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

Road potholes and metro work giving troubles to citizens of Bhiwandi | रस्त्यावरील खड्डे व मेट्रोचे काम भिवंडीकरांसाठी ठरतेय डोकेदुखी; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

रस्त्यावरील खड्डे व मेट्रोचे काम भिवंडीकरांसाठी ठरतेय डोकेदुखी; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

Next

- नितिन पंडित 

भिवंडी ( दि २८ ) भिवंडी शहरात सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर या खड्ड्यांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्यादेखील बिकट झाली आहे. त्यातच एमएमआरडीच्या माध्यमातून ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या शहरात सुरु असून या मला मेट्रोच्या ठेकेदाराने मोट्रोचे काम करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी पत्रे लावले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

वास्तविक पाहता मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे मनपा व एमएमआरडीए प्राधिकरणाने हटविणे आवश्यक होते . मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे तशीच ठेऊन मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु केल्याने शहरातील अंजूरफाटा ते धामणकर नाका या दोन ते तीन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . त्यातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने हे खड्डे बुजविण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनाबरोबरच एमएमआरडीए अथवा मेट्रो प्रकल्प ठेकेदाराचे पुरते दुर्लक्ष झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे व मेट्रो प्रकल्पाचे काम भिवंडी शहरवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. मनपा प्रशासन केवळ खड्ड्यांमध्ये खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करते मात्र पावसामुळे ही खडी बाजूला झाल्याने पुन्हा खड्डयांची परिस्थिती जैसे थे अशीच होत आहे. 

Web Title: Road potholes and metro work giving troubles to citizens of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.