ठाण्यात पार पडली रस्ते सुरक्षा जागरूकता मोहिम

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 14, 2023 05:14 PM2023-09-14T17:14:34+5:302023-09-14T17:14:55+5:30

बाल विद्या मंदिर स्कूल, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात एचएमएसआयने २५०० शालेय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्याविषयी जागरूकता निर्माण केली.

Road safety awareness campaign was conducted in Thane | ठाण्यात पार पडली रस्ते सुरक्षा जागरूकता मोहिम

ठाण्यात पार पडली रस्ते सुरक्षा जागरूकता मोहिम

googlenewsNext

ठाणे : भारतात सुरक्षितपणे वाहन चालवण्याची सवय रूजवण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करत असलेल्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमेचे आयोजन ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये केले होते. यावेळी २५०० शालेय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूकीचे नियम जाणून घेतले. 

रस्त्यावर सुरक्षा कशी जपायची याविषयी होंडा जगभरात प्रसार करत असते. बाल विद्या मंदिर स्कूल, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात एचएमएसआयने २५०० शालेय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्याविषयी जागरूकता निर्माण केली. कंपनीच्या रस्ते सुरक्षा मार्गदर्शनाखाली वयोगटाला साजेसे रोड- सेफ्टी लर्निंग प्रोग्रॅम तयार करत सहभागी झालेल्या सर्वांना रस्त्यावर सुरक्षा कायम राखण्याचे महत्त्व समजेल याची काळजी घेतली. गेल्या २२ वर्षांपासून एचएमएसआयने महाराष्ट्रात ३.७ लाख प्रौढ आणि मुलांना रस्त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा तसेच सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे याचे शिक्षण दिले आहे.

अपघातमुक्त भारत उभारण्याच्या एचएमएसआयच्या बांधिलकीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे वरिष्ठ संचालक विनय धिंग्रा म्हणाले, ‘भविष्यात रस्त्याचा वापर करणार असलेल्या नव्या पिढीला शिक्षित करण्यावर एचएमएसआयचा भर आहे. तरुणांमध्ये सकारात्मक वृत्ती आणि रस्त्यावरील सुरक्षेबाबत शिस्त रूजवण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. रस्त्यावरील सुरक्षेला प्राधान्य देणारा, रस्त्यावर जबाबदारीने वर्तन करणारा समाज निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. ते पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना सक्षम व शिक्षित करून सुरक्षितपणे रस्त्याचा वापर करण्यास प्रेरणा देण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यासाठी अनुकूल मानसिकता विकसित करण्यासाठी एचएमएसआयने देशभरात रोड सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅम लाँच करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.

Web Title: Road safety awareness campaign was conducted in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे