रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; मोबाइल कंपन्यांच्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:16 AM2019-07-23T01:16:59+5:302019-07-23T01:17:08+5:30

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते.

Road widening; | रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; मोबाइल कंपन्यांच्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तरतूदच नाही

रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; मोबाइल कंपन्यांच्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तरतूदच नाही

Next

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण -बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण रखडणार आहे. कारण या रस्त्याखालील जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या हटवण्याकरिता स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली नाही. जोपर्यंत ही कामे होत नाहीत तोपर्यंत रुंदीकरण अशक्य आहे. साहजिकच रुंदीकरणाचे काम करताना ठेकेदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते. हे काम करण्यासाठी २०१४ ची मुदत होती. मात्र ते काम वेळेत संपले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने जेवढे काम झाले तेवढे काम पूर्ण करुन हा रस्ता अर्धवट अवस्थेत तसाच सोडून दिला. रस्ता अर्धवट राहण्यामागे रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेले अतिक्रमण हे मूळ कारण होते. या अतिक्रमणांवर वेळीच कारवाई न झाल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. २०१५ मध्ये या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अतिक्रमण हटवण्यात येईपर्यंत रस्त्याचे काम संपलेले होते. आर्थिक तरतुद शिल्लक न राहिल्याने तो रस्ता तसाच राहिला. आता या रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करुन त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा काढल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधीत ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. मात्र काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी वेळेत न मिळाल्याने हे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले. आचारसंहिता संपल्यावर काम सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता संपल्यावर पावसाळा सुरु होणार असल्याने पावसात रस्त्याचे खोदकाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक विभागाने पावसाचे कारण पुढे करुन रस्त्याचे काम करण्यास मज्जाव केला. अशा एक ना अनेक अडचणीत हा रस्ता सापडला असतांना आता एमएमआरडीएला आणखी मोठ्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत आयोजित रस्त्याच्या कामाबाबतच्या महत्वपूर्ण बैठकीत रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत माजी सभापती अ‍ॅड. संदीप भराडे, शामक गायकवाड, सुरेंद्र यादव आणि श्रुती सिंह यांनी रस्त्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर अधिकाºयांनी दिलेले उत्तर कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम पुन्हा रखडणार हे निश्चित असल्याचे संकेत देणारे आहे. रस्त्याचे काम करण्यास ठेकेदार तयार आहे. मात्र ज्या भागात रस्त्याचे काम करणे अपेक्षित आहे त्या भागात आयुध निर्माण कारखान्याची जलवाहिनी, जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी, एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहनिर्माण प्रकल्पाची जलवाहिनी आणि उल्हासनगर महापालिकेची जलवाहिनी आहे.

फॉरेस्ट नाका येथे काही जागा वन विभागाची असल्याने त्या ठिकाणी रुंदीकरण करतांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी वन विभागासोबत पत्रव्यवहार केला असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि वाढते अपघात पाहता या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारीच आपल्या अडचणी घेऊन समोर आले. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दालनात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. - मनिषा वाळेकर, नगराध्यक्ष

ऑप्टीकल फायबर वाहिन्या आणि वीज वितरण विभागाची विद्युत वाहिनी आहे. त्या स्थलांतरीत करुन रस्त्याच्या एका बाजूने नेण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. साहजिकच जोपर्यंत वाहिन्या स्थलांतरित होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणे अवघड आहे.

रस्त्यावरील वाढत्या अपघातांवर उपाययोजना आखण्याची गरज होती. त्यामुळे आंदोलन करुन या बैठकीचे आयोजन केले होते. आज या चर्चेत समाधानकारक निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. स्थानिक पातळीवर रस्त्याच्या सुरक्षेसाठी उपोययोजना आखले जाणार आहे. - अ‍ॅड. संदीप भराडे, नगरसेवक

Web Title: Road widening;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.