ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रस्तेदुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:45 AM2019-10-18T00:45:05+5:302019-10-18T00:45:13+5:30

नागरिकांचा विरोध : आता आठवले काम?

Roadmap in the run-up to the election | ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रस्तेदुरुस्ती

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रस्तेदुरुस्ती

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथ मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता पालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या या रस्तादुरुस्तीला आता नागरिकच विरोध करत आहेत. निवडणुका जवळ आल्याने त्यांना रस्त्याची दुरुस्ती आठवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर, पालिकेने हे काम नियमित कामापैकी एक असल्याचे स्पष्ट केले आहे.


गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करणे अवघड जात होते. मात्र, आता गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नगरपालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. आचारसंहितेच्या काळात कोणतेही काम करता येत नाही, याची जाणीव असतानाही शहरातील रस्त्यांचे काम सुरू आहे. या रस्तेदुरुस्तीवरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहे. विरोधक रस्तेदुरुस्तीला विरोध करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तर, विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर आरोप करून एवढे दिवस जे केले नाही, ते काम निवडणुकीच्या आधी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आपल्या चुका लपविण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप होत आहे.


या रस्त्यांसोबतच लोकनगरी रस्त्याची अवस्थाही बिकट असल्याने या रस्त्यावरही डांबरीकरण केले जात होते. मात्र, ते काम स्थानिकांनीच रोखले. निवडणुका आल्यावर रस्तेदुरुस्तीचे सोंग केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना हे काम जून महिन्यात देण्यात आलेल्या कामाचाच एक भाग आहे. त्यामुळे या कामाला आचारसंहितेचा अडथळा येत नाही. मात्र, काही रस्त्यांचे काम करणे आवश्यक असले, तरी ते काम २१ आॅक्टोबरनंतर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Roadmap in the run-up to the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.