अंबरनाथच्या गॅस गोदाम परिसरात रस्ते गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:23+5:302021-08-12T04:45:23+5:30
अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मीनगर चौकाकडून एक रस्ता नवरेनगरच्या दिशेने जातो. या रस्त्यावर मयखाना ते गॅस गोदाम पट्ट्यात गायत्री बिल्डिंगसमोरच तब्बल ...
अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मीनगर चौकाकडून एक रस्ता नवरेनगरच्या दिशेने जातो. या रस्त्यावर मयखाना ते गॅस गोदाम पट्ट्यात गायत्री बिल्डिंगसमोरच तब्बल १० ते १५ फूट लांबीचे खड्डे पडले आहेत. कितीही खड्डे चुकविण्याचा प्रयत्न केला तरी गाडी शेवटी खड्ड्यात जातेच, अशी अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे पादचारी, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांनी या रस्त्यावरून चालावे तरी कसे, असा प्रश्न या रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नसून त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
अंबरनाथ पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपूनही कोरोनामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे अंबरनाथ पालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र पालिकेचे अधिकारी शहरातील समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
----