जमिनी विकून ठाण्यात रस्ते

By admin | Published: August 17, 2016 02:51 AM2016-08-17T02:51:40+5:302016-08-17T02:51:40+5:30

शहरातील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी करुन सुद्धा अनेक भागात, पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडत आहेत. यामुळे शहरातील सुमारे २७६ रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटीकरणाचा निर्णय

Roads in Thane by selling land | जमिनी विकून ठाण्यात रस्ते

जमिनी विकून ठाण्यात रस्ते

Next

अजित मांडके,  ठाणे
शहरातील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी करुन सुद्धा अनेक भागात, पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडत आहेत. यामुळे शहरातील सुमारे २७६ रस्त्यांचे यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी शहरातील पडीक जमीनी, टीडीआर विकून, कर्ज काढून आणि राज्य शानाकडून यासाठी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमासाठी निधी श्रीमंत म्हणवणारी ठाणे महापालिका उभारणार आहे.
यासाठी अंदाजे ५५० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. यामुळे महापालिकेचा श्रीमंतीचा दावा खरा की खोटा याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याशिवाय शहरात सामाजिक सुविधा भूखंडासह मैदानांची वाणवा असताना अशा पद्धतीने मोकळ्या जमिनी विकण्याचा निर्णयही प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची भीती असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि विरोधक यावर काय भूमिका घेतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३५६ किमीचे रस्ते असून त्यापैकी आतापर्यंत १०३ किमीचे रस्ते हे यूटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात १०.२७ किमीच्या रस्त्यांना मंजुरी दिलेली आहे. तर उर्वरित २४२.६७ किमीचे रस्ते हे डांबरीकरणाचे आहेत. रस्त्यांवर वांरवांर पडणाऱ्या खडड््यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कायापालट केला जाणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील ४.५ किमी ते १५ किमीचे रस्ते हे यूटीडब्ल्युटी पद्धतीने आणि १५ किमीचे रस्ते हे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. यासाठी पालिका स्वत: १२५ कोटी, राज्य शासनाकडून १२५ कोटी, स्फॉट लोनच्या माध्यमातून १२५ कोटी आणि पालिका हद्दीतील जमिनीचे पैशात रुपांतर करुन म्हणजेच जमीनी विकून त्या माध्यमातून १२५ कोटी रुपये उभे करणार आहे.

Web Title: Roads in Thane by selling land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.