उल्हासनगरातील रस्ते गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:23+5:302021-09-16T04:50:23+5:30

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सर्वच रस्त्यावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना माेठी कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहने बंद पडण्याचेही प्रकार ...

The roads in Ulhasnagar went into a ditch | उल्हासनगरातील रस्ते गेले खड्ड्यात

उल्हासनगरातील रस्ते गेले खड्ड्यात

Next

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सर्वच रस्त्यावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना माेठी कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहने बंद पडण्याचेही प्रकार घडत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील जीवन मेडिकल समाेर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बुधवारी रिक्षाचे चाकच निखळून पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात माेठा अपघात हाेण्याआधीच खड्डे भरून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी रिक्षा संघटना, व्यापारी आणि नागरिक करीत आहेत. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास व्यापारी आणि रिक्षा संघटनेतर्फे भीक मांगाे आंदाेलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेचे साेनू आहुजा यांनी दिला.

उल्हासनगरमधील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्ड्यांमुळे शहरात वाहतूककोंडी हाेत आहे. संततधार पावसामुळे महापालिका रस्त्यातील खड्डे खडी, डेब्रिज टाकून भरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरले नसल्याने रस्ते खड्ड्यात गेल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे सोनू आहुजा, हरी चावला यांनी केला. रिक्षा चालकांनी रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करून व्यापाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शेखर यादव यांनी रिक्षाचालकांना सबुरीचा सल्ला दिला. संततधार पावसामुळे रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे राहिल्याचे सांगून पाऊस थांबताच रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.

पाऊस थांबताच रस्ते दुरुस्ती

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे बुजविले नसल्याने रस्ते खड्डेमय झाल्याची कबुली शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली. पाऊस थांबताच रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती शितलानी यांनी दिली. रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी व दुरुस्तीसाठी साडेसहा कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. मोर्यानगरी रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती हॉस्पिटल रस्ता, खेमानी रस्ता, शहाड फाटक रस्ता, गायकवाड पाडा रस्ता, व्हीनस चौक ते लालचक्की रस्ता, स्टेशन रस्ता, शिरू चौक परिसर रस्ते असे बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. महापौर लीलाबाई अशान यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात बैठक घेऊन रस्त्यातील खड्डे भरण्याचे आदेश दिले.

Web Title: The roads in Ulhasnagar went into a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.