दरोडेखोरांना पाच दिवसांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:48+5:302021-04-02T04:42:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ...

The robbers were arrested in five days | दरोडेखोरांना पाच दिवसांत अटक

दरोडेखोरांना पाच दिवसांत अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे, तसेच उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

वाहोली येथील रहिवासी मोतीसम शेंदू (४५) यांचे कल्याण- मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ कडबा कुटीचे दुकान आहे. २० मार्चला पहाटे ४.३५ वाजेच्या सुमारास दुकानात चार चोरट्यांनी घुसून शेंदू यांना मारहाण केली. त्यानंतर एक मोबाइल व ४० हजार रुपये लंपास केले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील चार व इतर पाच, अशा नऊ चोरट्यांनी पावशेपाडा व पांजारपोळ येथे दरोडा घालून जवळजवळ चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला असल्याची बाब टिटवाळा पोलिसांच्या निदर्शनास आली.

या दोन्ही घटनांतील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मुरबाड डॉ. बसराज शिवपुजे, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी एक विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून‌ गुन्ह्यातील तीन आरोपींना अवघ्या पाच दिवसांत २५ मार्चला पारनेर येथून अटक केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली जीपही जप्त करण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात मुरबाड उपविभागीय कार्यालय येथे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि सहायक पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती घेण्यात आली होती. या घटनेतील तीन आरोपींचा शोध घेत असून, या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.

कोठडीत केली रवानगी

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर तीन आरोपींना २८ मार्चला पारनेर येथून अटक करण्यात आली. त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तर १ एप्रिलला हजर केलेल्या तीन आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

------------------

Web Title: The robbers were arrested in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.