रेशनिंग दुकानदारांकडून लूट
By admin | Published: December 9, 2015 12:38 AM2015-12-09T00:38:19+5:302015-12-09T00:38:19+5:30
हिवाळा सुरु झाल्याने सामान्य वर्गातील कुटुंबांकडून रेशनिंगवर काळ्याबाजारातून मिळणाऱ्या रॉकेलच्या खरेदीची मागणी वाढत आहे.
राजू काळे, भार्इंदर
हिवाळा सुरु झाल्याने सामान्य वर्गातील कुटुंबांकडून रेशनिंगवर काळ्याबाजारातून मिळणाऱ्या रॉकेलच्या खरेदीची मागणी वाढत आहे. ही मागणी लक्षात घेता शहरातील रेशनिंग दुकानदार त्या खरेदीदारांकडून सुमारे ८० ते १०० रुपये दर आकारुन त्याची विक्री करीत असल्याचे उजेडात येत असूनही विभागीय रेशनिंग पुरवठा कार्यालय त्याकडे डोळेझाक करुन काळ्याबाजाराला उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात रेशनिंगची ११४ दुकाने असून त्यात उपलब्ध होणाऱ्या जिन्नसांची खरेदी केशरी व अन्तोदय वा पिवळे कार्डधारकांकडून मोठ्याप्रमाणात केली जाते. यातील केशरी कार्डधारकांची संख्या सुमारे ९७ हजार तर अन्तोदय व पिवळे कार्डधारकांची संख्या सुमारे २ हजार ७०० इतकी आहे. १५ रु. प्रती लिटरप्रमाणे रॉकेल तर पिवळे वा अन्तोदय रेशन कार्डधारकांना २ रुपये किलोप्रमाणे गहु व ३ रुपये किलोप्रमाणे तांदुळ उपलब्ध करुन दिला जात आहे. हे जिन्नस संबंधित कार्डधारकांससाठी उपलब्ध असले तरी अनेकवेळा ते काही रेशन दुकानदारांकडून दिले जात नाहीत तर काही वेळा त्यांचा पुरवठा कमी झाल्याने ती कमी प्रमाणात दिली जात असल्याचा दावा पिवळ्या रेशनकार्डधारकांकडून करण्यात आला आहे.
याबाबत आम आदमी पार्टीचे स्थानिक अध्यक्ष सुखदेव बेन सिंग यांनी सांगितले की, याविरोधात विभागीय रेशनिंग कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असूनही त्यावर कारवाई केली जात नाही. यामुळेच रेशन दुकानदार गरीबांसाठी उपलब्ध असलेल्या जिन्नसांचा खुलेआम काळाबाजार करण्यास धजावत आहेत. मीरा-भार्इंदर विभागीय रेशनिंग अधिकारी पी. पी. मनसेकर यांनी सांगितले की, रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यास रेशनिंग कार्यालयाला त्वरीत कारवाई करता येत नसल्याने तसा प्रकार निदर्शनास आल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात
यावी.