मीटर एजन्सीकडून रिक्षाचालकांची लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:11+5:302021-03-05T04:40:11+5:30
ठाणे : राज्य शासनाने रिक्षा भाड्यामध्ये वाढ केली आहे. या भाडेवाढ नंतर रिक्षांच्या मीटरमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. ती ...
ठाणे : राज्य शासनाने रिक्षा भाड्यामध्ये वाढ केली आहे. या भाडेवाढ नंतर रिक्षांच्या मीटरमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. ती करून घेण्यासाठी ज्या एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मात्र, या एजन्सींकडून रिक्षाचालकांची लूटमार केली जात आहे, अशी तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रहार संघटनेने केली आहे.
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी रिक्षा भाडेवाढला मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकांनी मीटर पासिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी शासनाने ७०० रुपयांची दर निश्चिती केली आहे. मात्र, ठाण्यातील सुपर, स्टॅईड, सनसुई व दिघे या मीटर एजन्सीकडून एक हजार रुपयांची मागणी रिक्षाचालकांकडे केली जात आहे. ही लूटमार असून ठाण्यातील सर्व रिक्षा संघटना आणि शासनाने नोंदणीकृत केलेल्या मीटर एजन्सी यांची संयुक्त बैठक बोलावून यावर तोडगा काढावा ; अन्यथा, रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड आणि प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियनचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी दिला आहे.