उल्हासनगरमध्ये ९३ माॅडीफाय सायलेन्सरवर रोलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:53+5:302021-06-22T04:26:53+5:30
उल्हासनगर : मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून चित्र-विचित्र आवाज काढणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक शाखेने साेमवारी कारवाई केली. यावेळी जप्त केलेले ...
उल्हासनगर : मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून चित्र-विचित्र आवाज काढणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक शाखेने साेमवारी कारवाई केली. यावेळी जप्त केलेले ९३ सायलेन्सर शिवाजी चौक ते लाल बहादूर शास्त्री चौकादरम्यान रस्त्यावर ठेवून त्यावरून रोलर फिरविण्यात आला. यावेळी कडक कारवाईचा इशाराही वरिष्ट पोलीस निरीक्षक श्रीकांत भरणे यांनी दिला.
उल्हासनगरमध्ये मोटारसायकलचे सायलेन्सर माॅडीफाय करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांविराेधातील तक्रारी शहर वाहतूक विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरणे यांच्या पथकाने ही कारवाई केली, तसेच, ई-चलनाद्वारे एक लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला. जप्त केलेले सायलेन्सर कॅम्प नं. ३ येथील शिवाजी चौक ते लालबहादूर शास्त्री चौकादरम्यानच्या मुख्य रस्त्यावर अंथरून त्यावरून रोलर चालविला. उल्हासनगर शहर वाहतूक विभागाप्रमाणे विठ्ठलवाडी वाहतूक शाखेनेही कारवाई करण्याची मागणी होत आहे.