जंक फूड नको रे बाप्पा; डोंबिवलीत रंगली पाककला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 08:21 AM2019-08-08T08:21:24+5:302019-08-08T08:21:31+5:30
दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे.
डोंबिवली: गेल्या 4 वर्षांपासून श्रावण महोत्सव आयोजित केला जातो.मिती क्रिएशन आणि मातोश्री प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील।सुगरणी साठी बुधवारी रात्री उत्सव पाककलेचा, उत्सव खाद्यसंस्कृतीचा आयोजित आयोजित होता ह्या स्पर्धे अंतर्गत 5 विजेते निवडले जातात. अंतिम स्पर्धा मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात असते तेव्हा राज्यभरातून सुगरणी इथे येतात आणि त्यातून मग अंतिम स्पर्धा होत असते.
दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे. वेगवेगळ्या भाज्या लहान मूल खायचा कंटाळा करतात पण भाज्या पौष्टिक असतात, त्यात व्हिटॅमिन असतात. मुलांना भाज्यांची सवय लागावी म्हणून आपण त्याच भाज्यांचं मिश्रण पराठा मध्ये केले तर मुलं ते आवडीने खातील ह्याच संकल्पनेतून आज 200 मातांनी अगदी रान भाज्या ,अळू ची भाजी, मेथी, फरसबी, गाजर, मुळा, कांदा, बटाटा, कडधान्य,सर्व प्रकारच्या पराठा बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. ह्यासर्व महिलांना एकत्र करण्याचं काम मातोश्री प्रतिष्ठांनच्या डोंबिवली च्या झोनल हेड कविता गावंड याच आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उतरा मोने हया होत्या, तर प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्युट्रिशनिस्ट नमिता नानल ह्या परीक्षक म्हणून ह्या कार्यक्रमाला लाभल्या तर कवीता गावंड यांच्या सोबत कीर्ती पाटील,शिल्पा मोरे,मानसी गावडे,शीतल धुरी, प्रतिमा पांचाळ, सूचिता पाटील, अनिता मयेकर, लता चव्हाण,किरण मोंडकर, अस्मिता खाणविलकर, प्रतिमा नारखेडे,स्वाती मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे आयोजक गावंड यांनी सांगितले.