रोटरीचा ‘गो व्हिलेज’ प्रकल्प कासगाववाडीत

By Admin | Published: January 14, 2017 06:25 AM2017-01-14T06:25:30+5:302017-01-14T06:25:30+5:30

तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून दूर आहेत. मात्र, असे असले तरी ते निसर्गसौंदर्य जपून आहेत. अशाच गावांपैकी

Rotary's 'Go Village' project in Kasgaonwadi | रोटरीचा ‘गो व्हिलेज’ प्रकल्प कासगाववाडीत

रोटरीचा ‘गो व्हिलेज’ प्रकल्प कासगाववाडीत

googlenewsNext

बदलापूर : तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून दूर आहेत. मात्र, असे असले तरी ते निसर्गसौंदर्य जपून आहेत. अशाच गावांपैकी एक गाव घेऊन त्यात विविध कार्यक्र म घेण्याचा रोटरीचा उपक्र म सध्या वांगणीतील कासगाववाडी येथे सुरू आहे. यंदा कासगाववाडी हे गाव दत्तक घेतले असून रोट्रॅक्ट क्लब आॅफ आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नववर्षात येथे कार्यक्र म सुरू केले आहेत.
शहर आणि विकासापासूनही दूर असलेल्या अशा गावांमध्ये जाऊन अनेक प्रबोधनपर, मनोरंजन आणि विकास करणाऱ्या कार्यक्र मांचे उद्दिष्ट हाती घेत रोटरीच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने ‘गो व्हिलेज’ अर्थात गाव दत्तक योजना राबवली जात आहे. याच उपक्र मांतर्गत आदर्श महाविद्यालयाच्या रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी यंदाच्या वर्षी वांगणीजवळील कासगाववाडी हे गाव दत्तक घेतले आहे.
यापूर्वी बदलापूरजवळील कुडेरान या गावात अशा प्रकारे दत्तक घेऊन तेथे कार्यक्र म केले होते. या उपक्र मात चार दिवसांची भेट दिली जाते. त्यानुसार, रोटरीच्या सदस्यांनी येथे कार्यक्र मांना सुरुवात केली आहे. नुकतीच येथे स्वच्छता मोहीम राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे
महत्त्व पटवून देण्यात आले. या वेळी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छता, शिक्षण अशा अनेक विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामस्थांना या गोष्टी पटवण्यासाठी पथनाट्यही सादर करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ आणि लहान मुलांना आरोग्यविषयक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि ग्रामस्थांसाठी चौकात चित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Rotary's 'Go Village' project in Kasgaonwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.