ठाण्यात रिपाइं आठवले गटाला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 01:46 PM2020-09-06T13:46:54+5:302020-09-06T14:26:53+5:30
आम्ही एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे, असे मंगेश सादरे म्हणाले.
ठाणे : ठाणे शहरात रिपाइं (आठवले)ला मोठे खिंडार पडले आहे. आठवले गटाचे सरचिटणीस मंगेश सादरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यानी रिपाइं एकतावादीमध्ये जाहीर प्रवेश केला. युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी या सर्वांना पक्षप्रवेश दिला.
मंगेश सादरे हे काही वर्षांपूर्वी रिपाइं एकतावादीतून आठवले गटात गेले होते. मात्र , आठवले गटात कामाचे चीज होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच अंतर्गत कलहामुळे या पक्षाची ठाण्यात पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी रिपाइं एकतावादीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असा विश्वास वक्त केला. तसेच, पक्षप्रवेश करणारे मंगेश सादरे यांची ठाणे शहर युवाध्यक्ष, सुरेश मोरे यांची वागळे विभाग अध्यक्ष, बाळाजी नारायणकर यांची, वागळे विभाग सचिव, उपेंद्र गैड यांची वागळे विभाग उप.अध्यक्ष, संतनु सुर्यवंशी यांची सावरकर नगर वॉर्ड अध्यक्ष, कृष्णा कोळे वाड़ अध्यक्ष अंबिका नगर. हीरा पाल यांची वॉर्ड अध्यक्ष, राम नगर, सचिन करकेरा वॉर्ड सचिव सावरकर नगर, गोविंदा मोहन यांची वॉर्ड अध्यक्ष सावरकर नगर या पदांवर नियुक्ती ही करण्यात आली.
या पक्ष प्रवेशानंतर मंगेश सादरे यांनी, रिपाइं एकतावादीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. तसेच, भैय्यासाहेब इंदिसे हे सामाजिक समतोल राखून काम करीत आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी त्यांचे नेतृत्व प्रेरक ठरत असल्याचे कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
आणखी बातम्या...
राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान