दीड कोटींची खंडणी वसूली: ठाणे न्यायालयाने फेटाळला संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन

By जितेंद्र कालेकर | Published: August 20, 2021 09:52 PM2021-08-20T21:52:05+5:302021-08-20T21:54:02+5:30

मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला.

Rs 1.5 crore ransom recovered: Thane court rejects Sanjay Punamia's pre-arrest bail | दीड कोटींची खंडणी वसूली: ठाणे न्यायालयाने फेटाळला संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन

परमबीर सिंग खंडणी प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्दे सुनिल देसाईनेही घेतला अर्ज मागेपरमबीर सिंग खंडणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. यातील २८ पैकी निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, विकास दाभाडे यांनी यापूर्वीच अटकपूर्व अर्ज मागे घेतला असून शुक्रवारी सुनिल देसाई या निलंबित पोलीस कॉन्स्टेबलनेही अटकपूर्व जामीनअर्ज मागे घेतला.
मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल
करु न त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून प्रदीप शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अलिकडेच परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम तसेच खासगी व्यक्ती संजय पुनामिया, विकास दाभाडे, कुख्यात गुंड रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संजय पुनामिया याने रियाझ भाटी यांच्याकडून तब्बल दीड कोटींची खंडणी माजी पोलीस आयुक्त सिंग यांच्यासाठी घेतल्याचा दावा ठाणे न्यायालयात फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सागर कदम यांनी केला. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये, असा युक्तीवाद त्यांनी केला. ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी हे मान्य करीत पुनामिया यांचा हा अर्ज शुक्रवारी फेटाळला. तर देसाई यांच्या वकीलानेही त्याचाही अटकपूर्व जामीनाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे या आरोपींना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* शर्मा तळोजा करागृहात-
अंटालिया स्फोटक प्रकरणात संशयित आरोपी असलेले शर्मा हे एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात ठेवले आहे. याच कारागृहातून त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाणेनगरच्या खंडणीतील गुन्हयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज त्यांनी अलिकडेच घेतला आहे.

Web Title: Rs 1.5 crore ransom recovered: Thane court rejects Sanjay Punamia's pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.