मीरारोडमध्ये सदनिका विक्रीच्या आड ४२ लाखाना गंडवले, एकच सदनिका दोघांना विकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:13 PM2022-04-05T19:13:27+5:302022-04-05T19:14:01+5:30

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Rs 42 lakh was wasted on sale of flats in Mira Road, one flat was sold to two people | मीरारोडमध्ये सदनिका विक्रीच्या आड ४२ लाखाना गंडवले, एकच सदनिका दोघांना विकली

मीरारोडमध्ये सदनिका विक्रीच्या आड ४२ लाखाना गंडवले, एकच सदनिका दोघांना विकली

Next

मीरारोड - सदनिका विक्रीच्या बहाण्याने एकास ४२ लाख रुपयांना फसवल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . धक्कादायक बाब म्हणजे सदर दोघा भामट्यांनी तीच सदनिका आणखी एकास विक्री केली आहे.

सोमवार ४ एप्रिल रोजी फिर्यादी गोपाल लालजी गुप्ता रा . सहयाद्रीनगर, कांदीवली यांच्या नुसार , त्यांना काशीमीरा भागात राहण्यासाठी घर खरेदी करायचे असल्याने त्यांच्या ओळखीच्या इस्टेट एजंट साबीर कुरेशी ह्याला सांगितले. साबीर ने ऑक्टोबर २०२० मध्ये गुप्ता यांची एस . एम . सी . कन्स्ट्रक्शन नावाने व्यवसाय करणाऱ्या सतिश अशोक पुनामिया रा. ओम शिवालय, कनकिया मीरारोड आणि मिनबहादुर उदयसिंग टमाटा रा. गंगा बिल्डींग, जमुना हौ.सो. एव्हरशाईन कॉम्प्लेक्स, वसई यांच्याशी साईटवर ओळख करून दिली होती. त्यावेळी गौरव एस्टर मधील सदनिका गुप्ता यांना सतिश आणि मिनबहादुर यांनी दाखवली असता ती पसंत पडली .

५० लाखांचा सौदा ठरल्या नंतर थोडे थोडे करून तब्बल ४२ लाख ४० हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरण द्वारे गुप्ता यांनी दिले . एप्रिल २०२१ मध्ये सदर सदनिका खरेदी - विक्री चा करारनामा नोंदणीकृत करून दोघांनी गुप्ता याना दिला . परंतु सदनिकेचा ताबा देण्यास मात्र दोघेही टोलवाटोलवी करत होते . दरम्यान सतिश आणि मिनबहादुर हे दोघे फसवणूक करणारे भामटे असल्याचे गुप्ता यांना लोकां कडून समजले . त्यातच सदर सदनिका त्या दोघांनी पूर्वीच सतिश जयंतीलाल खिमावत, रा. गुंडेचा गार्डन, लालबाग यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दोघा भामटयां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पोलीस अधिक तपास करत आहेत .

Web Title: Rs 42 lakh was wasted on sale of flats in Mira Road, one flat was sold to two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.