ग्रामीण भागात सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून ५० रुपयांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:39+5:302021-09-12T04:46:39+5:30
स्टार ११६१ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: गॅसच्या किमती हजार रुपयांच्या घरात असताना घरपोच डिलिव्हरीसाठी पुन्हा एक्स्ट्रॉ पैसे ...
स्टार ११६१
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: गॅसच्या किमती हजार रुपयांच्या घरात असताना घरपोच डिलिव्हरीसाठी पुन्हा एक्स्ट्रॉ पैसे मोजले जातात. याची कुठलीही पावती दिली जात नाही. हे अतिरिक्त पैसे घेणे योग्य आहे का, असा सवाल ग्राहकांकडून विचारला जात आहे. टिटवाळासह ग्रामीण भागात सिलिंडरमागे ३० ते ५० रुपये मागितले जातात. शहरी भागात तुलनेने अतिरिक्त पैसे मागण्याचे प्रमाण कमी असले तरी स्वेच्छेने अनेकदा ग्राहक गॅस डिलिव्हरी करणाऱ्यांना किमान १० ते २० रुपये देतात. परंतु ग्रामीण भागात सगळ्यांकडून कमी-अधिक प्रमाणात वरचे पैसे घेतले जातात.
टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी विजय दिशेकर यांनी अतिरिक्त पैशांच्या मागणीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याबाबत त्यांनी अनेकदा आवाज उठवला असून काही भागांत ग्राहक स्वतःहून वरचे पैसे देतात तेव्हा नाईलाज असतो, असेही ते म्हणाले. गॅस सिलिंडरची घरोघरी डिलिव्हरी करणाऱ्या कामगाराला एजन्सीचालक सुमारे १५ हजार रुपये पगार देतो. तसेच वरकमाईचे दिवसाला किमान १०० रुपये मिळतात, असे डोंबिवलीतील एजन्सीचालकाने सांगितले.
----------^^^^^^%;---
सध्याचा गॅस सिलिंडर दर - ८४०.००
शहरातील एकूण ग्राहक - सुमारे २ लाख
----------
वर्षभरात गँस सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची वाढ झाली असून, भाववाढ कमी होण्याचे नाव घेत नाही. याचा त्रास सामान्यांना होत आहे. जशी इंधनाच्या किमतीने शतक गाठले तशी काही दिवसांनी सिलिंडर एक हजार रुपयांना मिळेल, असे बोलले जात आहे. २०१४ मध्ये जो गॅस सिलिंडर ४४० रुपयांना मिळत होता. तो सध्या ८४० रुपयांना मिळत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
–---------------------- ;;
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
जेव्हा गॅस सिलिंडरचे दर आवाक्यात होता तेव्हा सिलिंडर उचलून आणणाऱ्या कर्मचाऱ्याला १० ते २० रुपये देणे योग्य होते. आता हजारच्या जवळ गॅस सिलिंडर पोहोचला आहे. सिलिंडरच्या किमती नियंत्रित व्हायला हव्या.
विजय देशेकर, जागरूक ग्राहक, टिटवाळा
-------------
हजार रुपयांच्या घरात सिलिंडर गेला. त्याखेरीज डिलिव्हरी बॉयला वरचे पैसे का द्यावे? असा प्रश्न पडतो.
त्रस्त गृहिणी, डोंबिवली
----------------
४) वितरक काय म्हणतात?
शहरी भागात काही वर्षांपूर्वी डिलिव्हरी बॉय पैशांची मागणी करायचे, पण अलीकडे त्यांना मिळणारे मानधन पुरेसे आणि वेळेत दिले जाते. त्यामुळे पैसे मागण्याचे प्रमाण अल्प आहे. अनेकदा ग्राहक स्वतःहून वरचे पैसे राहू दे असे सांगतात. त्यामुळे मग अन्य ग्राहकांकडूनही अपेक्षा वाढले. डिलिव्हरी बॉयचे मानधन १५ हजार रुपये असून कल्याण-डोंबिवलीत ८०० डिलिव्हरी बॉय आहेत.
- घरगुती गॅस सिलिंडर वितरक
..............
वाचली