जिल्ह्यात खाजगी शाळांमध्ये १२ हजार विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:57+5:302021-03-07T04:36:57+5:30
ठाणे : शिक्षणाचा हक्क म्हणजे आरटीई या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी ६७७ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून १२ ...
ठाणे : शिक्षणाचा हक्क म्हणजे आरटीई या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी ६७७ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून १२ हजार ७४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
या जागेवर मागासवर्गीय, गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारातील विद्यार्थ्यांना यंदा पूर्व प्राथमिक व पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संबंधित पालकांना २१ मार्चपर्यंतची मुदत आहे.
यात ११ हजार ११४ विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर पूर्व प्राथमिकच्या वर्गात ९६० बालकांना ऑनलाइन प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक ती माहिती देण्यासाठी पालकांच्या मदतीला जिल्ह्यात ठिकठिकाणी मदतकेंद्रांचे नियोजन केले आहे. ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. यास अनुसरून जास्तीतजास्त पालकांनी या प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या शालेय प्रवेशाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे.