आरटीआय कार्यकर्तीला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:20 AM2018-01-19T00:20:28+5:302018-01-19T00:20:40+5:30
बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारुशीला पाटील हिला गुरु वारी
कल्याण : बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारुशीला पाटील हिला गुरु वारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी पाटीलच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज न सादर केल्याने तिची रवानगी येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली.
पाटील हिला खंडणीविरोधी पथकाने खंडणीतील काही रक्कम स्वीकारताना रविवारी रंगेहाथ अटक केली होती. कल्याण न्यायालयाने तिला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती केली. मात्र, पोलीस कोठडीची दिलेली मुदत पुरेशी होती, असे मत व्यक्त करत आरोपीच्या वकिलांनी सरकारी वकिलांची मागणी अमान्य करण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंकडील मते जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी पाटीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपी पाटील हिने न्यायालयाच्या आवारात आपल्याला आणि सहकाºयांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप तक्रारदार सुरेंद्र पाटील यांनी केला आहे. याची तक्र ार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमची नाहक बदनामी
केडीएमसी मुख्यालयातील राष्ट्रवादीच्या गटनेता कार्यालयातून आरोपी पाटील हिने अनेक तक्र ार अर्ज केल्याचे उघड झाले आहे. तक्रारदार पाटील व चारु शीला पाटील यांच्यातील देण्याघेण्याची बातचीतही तेथेच झाली आहे. गटनेता कार्यालयातील सचिव व शिपायालाही पोलिसांनी चौकशीस बोलावले होते.
परंतु, या प्रकरणात पक्षाची बदनामी होत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते म्हणाले. गटनेता कार्यालय असल्याने दररोज अनेक नागरिक येतात. त्यामुळे आमच्या पक्षाच्या गटनेत्याचा कार्यालयाचा जो उल्लेख सर्वत्र होत आहे, तो चुकीचा आहे.
यासंदर्भात आम्ही केडीएमसी आयुक्त व पोलीस उपायुक्तांंची भेट घेणार आहोत. तसेच गटनेत्यांसमवेत प्रमुख पदाधिकाºयांना गुरुवारी बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्याचे हनुमंते यांनी सांगितले.