आरटीओ एजंटचे कामबंद आंदोलन

By admin | Published: January 14, 2017 06:15 AM2017-01-14T06:15:12+5:302017-01-14T06:15:12+5:30

वाहन चालवण्याच्या परवान्यासह विविध कामांसाठी परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात

RTO Agent's Bandh Movement | आरटीओ एजंटचे कामबंद आंदोलन

आरटीओ एजंटचे कामबंद आंदोलन

Next

ठाणे : वाहन चालवण्याच्या परवान्यासह विविध कामांसाठी परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली. शासनाच्या या धोरणाविरोधात ठाण्यातील आरटीओ एजंट्सने शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे एजंट्सकडून नागरिकांना सेवा मिळू शकली नाही.
महाराष्ट्र आरटीओ कन्सल्टंट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित गांधी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सामान्यांना या शुल्कवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने संघटनेचा या निर्णयास विरोध असल्याचे ते म्हणाले. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी शासनस्तरावर या मुद्यावर चर्चा करीत आहेत. त्यात काय निष्पन्न होते, त्यावर संघटनेची पुढील भूमिका ठरेल, असे त्यांनी सांगितले. (प्र्रतिनिधी)

Web Title: RTO Agent's Bandh Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.