दुचाकी अपघात रोखण्यासाठी आरटीओची अनोखी शक्कल
By अजित मांडके | Updated: November 8, 2023 15:57 IST2023-11-08T15:55:26+5:302023-11-08T15:57:15+5:30
दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्ष्यात घेता हि शक्कल लढविण्यात आली आहे.

दुचाकी अपघात रोखण्यासाठी आरटीओची अनोखी शक्कल
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दुचाकी स्वारानी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. दुचाकीचे लायसन काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सिम्युलेटर मशीनवर सराव करायला मिळणार आहे. दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्ष्यात घेता हि शक्कल लढविण्यात आली आहे.
युनायटेड वे संस्था आणि एएलडी ऑटोमोटिव्ह यांच्या सहकार्याने सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालविण्याचा फील दिला जात असून, सिग्नल, रस्ते, नागमोडी वळण, पाऊस, गतिरोधक आदी सर्वांचा समावेष करण्यात आला आहे.यामुळे चालकांना दुचाकी चालविताना दोष समजणार आहेत. मर्फी जवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कक्षाचे आणि दुचाकी सिम्युलेटर चे उदघाटन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या हस्ते पार पडले यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके, प्रसाद नलवडे, युनायटेड वे तेजस्विनी, आर्या जयस्वाल, उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. विनय राठोड म्हणाले की, आजच्या तरुण पिढीसाठी सिम्युलेटरचे नवीन तंत्रज्ञान खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. वाहतूक नियमांनुसार वाहन चालविणे केव्हाही सुरक्षित असते. मात्र अनेकजण नियमांची पायमल्ली करतात. दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी सिम्युलेटर मशीन मदतगार ठरू शकेल. दुचाकी स्वाराने वाहतुक नियमानुसार गाडी चालविणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील सिग्नल, खुणा, वेग मर्यादा, आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असते. मात्र परीक्षेत वाहन चालविताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केलं जात. मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्वाचा दुवा असणार आहे.
दुचाकी स्वारासाठी सिम्युलेटर कक्ष ठेवला आहे. सिम्युलेटर मशीन असून सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे. केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे. यात एक्सलेटर, गियर, आदी सर्व दिल असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते, चौक, सिग्नल, नागमोडी वळण, खड्डे, पाऊस, शाळा, रुग्णालय धुकं आदी सर्व दाखविले आहे. शहर/महामार्ग, कमी जास्त गर्दी , विविध प्रकारचे हवामान, विविध प्रकाशयोजना, पाऊस, धुके, इ प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते , ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालविण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते. शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीन वर दिसतो.
जयंत पाटील (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे )