महिलांशी असभ्य वर्तन : अधिकाऱ्यांच्या केबिनला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:35 AM2018-07-14T03:35:34+5:302018-07-14T03:43:14+5:30

मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी हे महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.मासिक सभेला अनुपस्थित राहतात. कर्मचा-यांना भरसभेत शिवीगाळ करून ऊठबशा काढायला लावतात.

 Rude behavior to women: Lock the cabin of the officials | महिलांशी असभ्य वर्तन : अधिकाऱ्यांच्या केबिनला ठोकले टाळे

महिलांशी असभ्य वर्तन : अधिकाऱ्यांच्या केबिनला ठोकले टाळे

Next

मुरबाड -  मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी हे महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.मासिक सभेला अनुपस्थित राहतात. कर्मचा-यांना भरसभेत शिवीगाळ करून ऊठबशा काढायला लावतात. त्यांच्या बदलीसाठी शुक्रवारी सभापती, उपसभापती, सदस्य, भाजपा तालुकाध्यक्ष, मुरबाड शहराध्यक्ष यांनी गटविकास अधिकाºयांच्या केबिनला टाळे ठोकून निषेध नोंदवला. दरम्यान, असभ्य वर्तनासंबंधातील आरोपाबाबत हश्मी यांनी बोलण्यास नकार दिला.
मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हश्मी हे पंचायत समिती सदस्यांना तसेच तालुक्यातून येणाºया नागरिकांना कामात सहकार्य करत नाहीत. विकासकामात अडथळा आणून वेळेवर बिले दिली जात नाहीत. पंचायत समितीच्या महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.
पंचायत समितीतील महिला कर्मचाºयांना मीटिंगमध्ये सर्वांसमक्ष शिवीगाळ करतात. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. सभापती-उपसभापतींनाही कामात सहकार्य करत नाहीत. असा मनमानी कारभार असल्याने हा गटविकास अधिकारी बदलून त्यांच्याजागी तत्काळ दुसरा अधिकारी द्यावा, या मागणीसाठी सभापती जनार्दन पादीर, उपसभापती सीमा घरत, सदस्य श्रीकांत धुमाळ, चंद्रकांत सासे, प्रतिभा खापरे, स्नेहा धनगर, जया वाघ, अरु णा खाकर, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, शहराध्यक्ष रूपेश गुजरे आणि भाजपाच्या अन्य कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना निवेदन दिले आहे.
गटविकास अधिकारी हश्मी यांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांचे असभ्य वर्तन रोखण्यासाठी सभापतीसह सदस्यांनी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामात असहकार्य करत असणा-या गटविकास अधिका-याला त्याच्या केबिनमध्ये जाऊ देणार नाही. जोपर्यंत आम्हाला दुसरा अधिकारी मिळत नाही, तोवर आम्ही केबिन उघडू देणार नाही.
- जनार्दन पादीर, सभापती, पंचायत समिती, मुरबाड

आम्हा महिला सदस्यांना असभ्य वर्तन करून बोलणे, विचित्र हावभाव करणे, महिला कर्मचाºयांना शिवीगाळ करणे, असे गटविकास अधिकाºयाचे विक्षिप्त वागणे आहे. महिलांचा सन्मान न राखणारा असा अधिकारी आम्हाला नको.
- सीमा घरत, उपसभापती,
पं.स. मुरबाड

सत्ताधारी भाजपाची पंचायत समितीमध्ये सत्ता असूनही सभापती आणि सत्ताधारी सदस्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची केबिन बंद करून कामकाज बंद करणे, हे लोकशाहीच्या विरोधात आहे.
- बाळाराम सूर्यराव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे जिल्हा

गटविकास अधिकाºयांची केबिन बेकायदेशीर बंद करणे, हे अनुचित आहे. ज्यांनी केबिनला टाळे ठोकले, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

मुरबाड पंचायत समितीमधील घरकुले आणि शौचालयाची बिले प्रलंबित आहेत. मात्र, त्याची शहानिशा आणि तपासणी केल्याशिवाय मंजूर करणे शक्य नसल्याचे सांगत प्रत्यक्ष पाहणी करणे म्हणजे मनमानी नाही.
- एस.ई.ए. हश्मी, गटविकास अधिकारी, मुरबाड

Web Title:  Rude behavior to women: Lock the cabin of the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.