सोसायटीच्या आवारात यापुढे मज्जाव पालिकेने तयार केली सोसायंटीसाठी नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 04:04 PM2020-04-27T16:04:25+5:302020-04-27T16:04:48+5:30
ठाणे शहरातील सोसायटीधारकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने आता सोसायटींसाठी एक नियमावली तयारी केली आहे. या माध्यमातून सोसायटींमधील सदस्यांनी नियमावलींचे उल्लंघन केल्यास सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व सोसायटींसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्कींगच्या भागात एकत्रित दिसत आहेत. त्यामुळे असे प्रकार आता आढळून आले तर संबधीत सोसायटीच्या अध्यक्ष तसेच सचिव यांच्यावर प्रवेश देऊ नये, एकत्रित गच्चीवर दिसू नये अशा सुचनाही केल्या आहेत. असा प्रकार घडल्यास संबधीत सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले.
कोरोनावर आळा बसावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. आता याचाच एक भाग म्हणून पालिकेने सोसायटीधारकांसाठी एक नियमावली तयार केली आहे. ती नियमावली आता शहरातील प्रत्येक सोसायटींना देण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे काय करु नये याची नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव याने कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करावी ती सोसायटीच्या सुचना फलकावर प्रसिध्द करावी, सोसायटीच्या कॉमन एरीया, पार्कींग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निंग वॉक, इव्हनींग वॉकसाठी या भागांमध्ये जाऊ नये तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू याची काळजी घ्यावी असेही नमुद करण्यात आले आहे. सोसायटीच्या एखाद्या सदस्याने देखील या निमयावलीकडे दुर्लक्ष केले तर त्याला सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतरही सभासद ऐकत नसले तर त्याच्या विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, सोसायटीमध्ये असलेल्या नर्सींग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात यावे, त्यातही सोसायटीमधील एखादा नागरीक कोरोना बाधीत आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणुक देऊ नये असेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमावलींचे पालन न झाल्यास संबधींत सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.