Thane Politics: सत्ताधारी शिवसेना आवाज दाबते; राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांचे एकत्रित आयुक्तांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:28 PM2021-05-27T18:28:35+5:302021-05-27T18:29:00+5:30
Thane Politics: राज्या प्रमाणे ठाण्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवपार्पयत काम सुरु होते. परंतु मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार एकत्रित काम करुन भाजपचे मनसुबे हाणुन पाडण्याचे काम करीत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने भाजपबरोबर एकत्रित येऊन सत्ताधारी शिवसेना विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी आणि भाजपने गुरुवारी एकत्रित येऊन शिवसेनेच्या या कृतीच्या विरोधात थेट महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाणो महापालिका एक प्रा. लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोपही यावेळी या नगरसेवकांनी केली आहे.
राज्या प्रमाणे ठाण्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवपार्पयत काम सुरु होते. परंतु मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नालेसफाईंचा मुद्दा असो किंवा शहरातील झाडांच्या पडझडीचा मुद्दा किंवा कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सीजनचा मुद्दा असो अशा अनेक मुद्यावरुन शाणु पठाण यांनी सत्ताधा:यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाजपचा आवाज देखील महासभेत म्युट केला जात असल्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे भाजपकडून सुरु असलेल्या आरोपांना शिवसेनेकडून उत्तरे देणो सुरु असतांनाच आता त्यांच्या महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडून देखील महापालिका प्रशासनावर अर्थात शिवसेनेवर टिका सुरु केली आहे. महासभेत नगसेवकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप यावेळी या तीनही पक्षाच्या नगरसेवकांनी केला. २०१४ पासून सभागृह अतिशय चुकीच्या पध्दतीने सुरु असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीने केला आहे. हम करे सो कायदा म्हणत येथे शिवसेनेची प्रशासनाला हाताशी धरुन हुकुमशाही सुरु असल्याचा आरोपही यावेळी या नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांना आपला आवाज महासभेच्या माध्यमातून पोहचविण्याची संधी असते. मात्र तिथेच आवाज दाबला जात आहे. चर्चा न करता ठराव पास केले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ठराविक नगरसेवक बोललात बाकींच्याना बोलण्याचा अधिकार नाही, ही कोणती हुकुमशाही आहे. असा सवालही यावेळी त्यांनी केला. त्यामुळे या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून यावर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर महासभेच्या दिवशी सभागृहाबाहेर बसून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल असेही यावेळी या नगरसेवकांनी स्पष्ट केले.
एकूणच राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्येही कॉंग्रेसने बिबा घालण्याचे काम सुरु केले असतांनाच आता स्थानिक पातळीवर सत्ताधारी शिवसेनेच्या एक कलमी कार्यक्रमाच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेला एकाकी पाडण्याचे काम येत्या काही दिवसात करण्याची रणनिती तर आखली जात नाही ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
लोकांच्या समस्या मांडण्यासाठी महासभा हे एकमेव व्यासपीठ आहे. परंतु तेथे केवळ ठराविक नगरसेवकांनाच बोलायला दिले जात आहे. इतर नगरसेवकांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे महासभेत बोलू दिले जाणार नसले तर यापुढे सभागृहाबाहेर आंदोलन केले जाईल.
(शाणु पठाण - विरोधी पक्षनेते, ठामपा)
२०१४ पासून महापालिकेचे सभागृह चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. कोरोनाच्या काळात वेबीनारद्वारे सभा घेतो, त्यात मोठे विषय असतांना सुध्दा त्यावर चर्चा केली जात नाही. विरोधात मत मांडले तर त्याचा आवाज म्युट केला जातो, हा लोकशाहीचा अपमान आहे. सभागृहातील चर्चा आणि होणारे ठराव यात फार मोठी तफावत आढळून आलेली नाही. त्यामुळे हे कामकाजही चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे यापूर्वी चुकीच्या पध्दतीने झालेले ठराव पुन्हा तपासण्यात यावे. लसीकरण समप्रमाणात होत नाही, यातही काही ठराविक नगरसेवकांकडे झुकते माप दिले जात आहे.
(हणमंत जगदाळे - जेष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी)
विशिष्ट पक्षाची हुकुमशाही, विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीच्या माध्यमातून सभागृह चालणार असेल तर ते चुकीचे आहे. यात पालिकेतील अधिकारी देखील सामील असतील तर त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, आज मान देऊन तुमच्या दालनात आलो आहोत, परंतु उद्या जर यावर योग्य तो निर्णय झाला नाही, तर आंदोलन उभे करु. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील.
(विक्रांत चव्हाण - नगरसेवक , कॉंग्रेस, ठाणे )
महासभेत विरोधकांचे आवाज म्युट केले जात आहे. वेबीनारद्वारे झालेल्या सभांमध्ये मर्जीतील नगरसेवकांना बोलू दिले जात आहे. दादगिरीने ठराव पास केले जात आहे, जे शहराच्या दृष्टीने महत्वाचे ठराव आहेत, ते अद्यापही धुळ खात पडून आहेत. परंतु काही ठराव अवघ्या तीन मिनिटात पास केले जात आहेत. आयत्या वेळेचे ठरावही चुकीच्या पध्दतीने केले जात आहे. त्यामुळेच यापुढे असे घडू नये या दृष्टीकोणातून ही भेट घेण्यात आली.
(मनोहर डुंबरे - गटनेते, भाजप)
चौकट - राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह इतर नगरसेवक मात्र यावेळी आयुक्तांच्या भेटीला गेल्याचे दिसून आले नाही. यावेळी केवळ निवेदन देण्यासाठी भाजप बरोबर जाणार असल्याचे समजल्यानंतर या नगरसेवकांनी जाण्यास इन्कार केला.
कोणाचेही आवाज म्युट केले जात नाही - नरेश म्हस्के
ही हास्यास्पद गोष्ट आहे, आवाज म्युट करणो याचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे, मी कोणाला म्युट करीत नाही, तेच एकमेकांना म्युट करीत असतात. खासकरुन भाजपमध्ये स्पर्धा असते, एखादा भाजपचा नगरसेवक बोलू लागला की, दुसरा नगरसेवक बोलायला लागतो आणि एका मागून एक बोलू लागतात आणि त्यांच्याच स्पर्धा रंगत असते. बाहेरुन आलेले आणि भाजपमध्ये असलेल्यांनामध्ये ही स्पर्धा आहे, ब:याचदा त्यांचे नेटवर्क गायब होते, एका वेळेस एकच जण बोलणो अपेक्षित आहे. परंतु दुसरा बोलायला लागल्यावर त्याला शांत बसायला सांगितले जाते. परंतु आयुक्तांकडे तक्रार करणो अयोग्य आहे. त्यांनी पिठासीन अधिकारी म्हणून माङयाकडे तक्रार करणो गरजेचे आहे. एखाद्याला बोलू देणो किंवा न बोलू देणो हा माझा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्यात जर हिम्मत होती तर त्यांनी माङयाकडे येणो गरजेचे होते. सध्या यांना विषय नाही, त्यामुळे काही तर विषय पाहिजे म्हणून केवळ प्रसिध्दीसाठी हा स्टंट होता.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)