भिवंडीत धोकादायक ईमारतीत मतदान केंद्र असल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:38 PM2019-04-28T23:38:40+5:302019-04-28T23:39:00+5:30
भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २६२ , २६३ या मतदान केंद्रावर असलेल्या अस्वच्छते व दुरावस्थेबाबत जिल्हा कार्यालयास समजताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
भिवंडी : भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २६२ , २६३ या मतदान केंद्रावर असलेल्या अस्वच्छते व दुरावस्थेबाबत जिल्हा कार्यालयास समजताच त्याठिकाणी भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी किसान जावळे , सहाय्यक निर्णय अधिकारी सदानंद जाधव , तहसीलदार शशिकांत गायकवाड , नायब तहसीलदार संदीप आवारी हे सर्व मतदानकेंद्र ठिकाणी पोहचले. सदरची इमारत धोकादायक आहे परंतु मतदानकेंद्र या इमारती मध्ये नसून त्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आहे. एमएसईबीच्या मालकीची ही जागा सन २००७ पासून पडून असल्याने याठिकाणी दुरावस्था झाली होती येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले असून तेथे आता सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.येथील मतदान निकोप वातावरणात पार पडेल अशी प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी दिली आहे .