मतदारराजासाठी धावाधाव! जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन

By योगेश पिंगळे | Published: October 20, 2024 10:12 AM2024-10-20T10:12:02+5:302024-10-20T10:13:00+5:30

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे.

Run for the voter king! Planning of 3 thousand 759 vehicles for various works of polling in the district | मतदारराजासाठी धावाधाव! जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन

मतदारराजासाठी धावाधाव! जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन केले आहे. यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, ऑटोरिक्षा आदी विविध वाहनांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे नियोजन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य, मतदार जनजागृती साहित्य, ईव्हीएम मशीन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहने, भरारी पथकांसाठी वाहने आदी वाहनांचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वाहतूक व्यवस्था पथकाच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

विधानसभा मतदारसंघ    मतदान केंद्रे     नियोजित वाहने

  • भिवंडी ग्रामीण    ३५१    १५१ 
  • शहापूर    ३२९    १९२ 
  • भिवंडी पश्चिम    ३०१    १७३ 
  • भिवंडी पूर्व    ३२८    १७८ 
  • कल्याण पश्चिम    ४४१    २०६ 
  • मुरबाड    ५१८    ३२७ 
  • अंबरनाथ    ३३९    १४७ 
  • उल्हासनगर    २६०    १७५
  • कल्याण पूर्व    ३३२    १५०
  • डोंबिवली    २७७    १५२ 
  • कल्याण ग्रामीण    ४३३    २३६ 
  • मीरा-भाईंदर    ४८९    २२६ 
  • ओवळा माजिवडा    ४८७    २९४ 
  • कोपरी-पाचपाखाडी    ३६६    १४८ 
  • ठाणे    ४०७    १९५ 
  • मुंब्रा- कळवा    ४०९    २४३ 
  • ऐरोली    ४४७    ३५२ 
  • बेलापूर    ३८०    २१४

Web Title: Run for the voter king! Planning of 3 thousand 759 vehicles for various works of polling in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.