'रन फॉर व्होट', मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:52 AM2019-10-13T11:52:49+5:302019-10-13T11:55:21+5:30

लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूपासून गृहिणींपर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे रविवारी मोठी गर्दी केली होती.

Run for vote in thane | 'रन फॉर व्होट', मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर 

'रन फॉर व्होट', मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर 

googlenewsNext

ठाणे - लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूपासून गृहिणींपर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे रविवारी (13 ऑक्टोबर) सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. एकाच रंगाचे टीशर्ट परिधान केलेल्या या सगळ्यांनीच एक धाव मतदानासाठी असा संदेश देत दौड केली. निमित्त होते, रन फॉर व्होट मॅरेथॅान स्पर्धेचे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.  

जिल्हातील 18 मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॅानचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी, ठाणे व माइल्स टू गो यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व सहभागी खेळाडूंना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शुभेच्छा देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. ही स्पर्धा 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर  अशा तीन किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत 5 वर्षापासून  अगदी  80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या स्पर्धकांचा नार्वेकर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी अपर्णा सोमाणी उपस्थित होत्या.

अधिकाऱ्यांनी केली 5 किलोमीटर दौड पूर्ण 

सकाळपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उप जिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी 5 किलोमीटरची दौड यशस्वी पूर्ण केली.

सेल्फी पॉईंटवर गर्दी 

सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. तरुणांसह, गृहिणी, जेष्ठ नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धकांनी घेतला सहभाग 

या स्पर्धेत विजया भट (आंतरराष्ट्रीय खेळाडू), श्रद्धा रननावरे (आंतरराष्ट्रीय धावपटू)

नंदा शेट्टी (आंतरराष्ट्रीय खेळाडू ), गुरुमूर्ती नायक (राष्ट्रीय धावपटू )

प्रशांत सारंग (राष्ट्रीय धावपटू)  या स्पर्धकांसह महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला.


 

Web Title: Run for vote in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.