धावती लोकल ट्रेन थांबवून चाकांचे नटबोल्ट केले टाइट; शहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 07:06 PM2018-07-28T19:06:23+5:302018-07-28T19:13:56+5:30

मध्यरेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून आलेली व टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन शहाड स्टेशनवर दुपारी थांबली. फ्लॅफार्म एकवर थांबलेली लोकल सुमार पाच ते सहा मिनीट थांबून होती. या दरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाती उतरले. त्यांनी फस्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटना

Running a local train with a wheeled nibbled knight; Shocking type at Shahd station | धावती लोकल ट्रेन थांबवून चाकांचे नटबोल्ट केले टाइट; शहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

शहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Next
ठळक मुद्देफर्स्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटनाधावती लोकल ट्रेन थांबवून चाकांचे नटबोल्ट केले टाइटशहाड स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

ठाणे : धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्का दायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या फ्लॅटफार्म क्र. १ वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रवाशांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.
मध्यरेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून आलेली व टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन शहाड स्टेशनवर दुपारी थांबली. फ्लॅफार्म एकवर थांबलेली लोकल सुमार पाच ते सहा मिनीट थांबून होती. या दरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाती उतरले. त्यांनी फर्स्ट क्लासचा डब्बा क्रमांक ‘११०१ ए’ या बोगी खाली घुसून चाकांचे नटबोल्ट टाइट केल्याची घटना फ्लॅफार्म क्र. २ वरील काही प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिली. एक कर्मचारी आत घुसलेला होता तर दुसरा बाहेरून चाकांची पहाणी करून पान्याव्दारे नटबोल्ट टाइट करीत ठोकठाक कराताना आढळून आला.
शहाड स्टेशनला थांबलेली नादुरूस्त ट्रेन प्रवाशांना घेऊन धावत असताना तिच्या चाकांजवळ काही तांत्रिक बिघाड झाला. मोटरमन किंवा तांत्रिक कामगारांना हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यामुळे तत्काळ आपल्या आवजारांची पिशवीतून सामान काढून त्यांनी दुरूस्ती केली. योगायोगाने या गाडीत मध्य रेल्वेचे तांत्रिक कामगार असल्यामुळे त्यांनी दुरूस्तीचे काम केले. त्यामुळे संभाव्य दुर्देैवी घटना टळल्याचे फ्लॅटफार्म क्रमांक दोन वरील प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाले. या गाडीच्या तांत्रिक कामाविषयी आवश्यक ती तपासणी कारशेडमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु त्यात काही उणीव असल्याची बाब लक्षात येताच शहाड स्टेशनवर ही लोकल ट्रेन थांबून तांत्रिक कामगारांनी सुदैवाने दुरूस्ती केल्याचे प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाले.
.

Web Title: Running a local train with a wheeled nibbled knight; Shocking type at Shahd station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.