जागतिक नोंदीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:13 AM2020-02-06T01:13:22+5:302020-02-06T01:14:24+5:30
आदिवासी विकास विभागाच्या २३ अनुदानित शाळांसह सर्वच आश्रमशाळांमध्ये बुधवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत सूर्यनमस्कार घातले.
भातसानगर : आदिवासी विकास विभागाच्या २३ अनुदानित शाळांसह सर्वच आश्रमशाळांमध्ये बुधवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत सूर्यनमस्कार घातले. याची लिम्का बुकमध्ये नोंद होण्याची अपेक्षा शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरु णकुमार जाधव यांनी व्यक्त केली.
आदिवासी विकास विभाग शहापूर अंतर्गत येणाºया २३ अनुदानित व इतर आश्रमशाळांमध्ये नऊ हजार ८०० आदिवासी विद्यार्थी व विद्यार्र्थिनी शिक्षण घेत आहेत. एकाचवेळी सर्व आश्रमशाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक शाळेत विशेष उपाययोजना करण्यात आली होती.
आदिवासी विकास विभागाचा एक प्रतिनिधी, डॉक्टरांचे पथक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र माचे नियोजन प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांनी केले. लिम्का बुकचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोळंकी यांच्या हस्ते अरुणकुमार जाधव यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जयंत विशे यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
२९६ विद्यार्थ्यांचा सहभाग
टोकावडे : मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या खुटृलबारागाव आदिवासी आश्रमशाळेतील २९६ विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. एका विद्यार्थ्याने एका तासात ९१ सूर्यनमस्कार घातले. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू सावंत, सदस्य गणपत भला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सूर्यनमस्कार व योगसाधना महत्त्वाची आहे असे उपस्थितांनी सांगितले.