भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:18 AM2019-06-16T00:18:40+5:302019-06-16T00:18:51+5:30

पालिका प्रशानाचे दुर्लक्ष; हिरवळीवरील लाखोंचा खर्च गेला वाया

Sachin Tendulkar becomes the alcoholic in the Bhaindar area | भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा

भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा

Next

भाईंदर/ मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या सरस्वतीनगर येथील सचिन तेंडुलकर मैदान व जवळच्या यशवंतराव चव्हाण उद्यानातील दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तेंडुलकर मैदान तर मद्यपी, व्यसनींचा अड्डाच बनला असून हिरवळीसाठीचा ४२ लाखांचा खर्च गेला कुठे असा प्रश्न केला जात आहे. परंतु पालिकेसह पोलिसांकडूनही या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसून नगरसेवकही पालिकेकडे बोटे दाखवत आहेत.

सरस्वतीनगर, साईबाबानगरच्या नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण हे पहिले उद्यान २०१० मध्ये पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आले. या उद्यानातील कारंजे बंद अवस्थेतच आहे. येथील प्रवेशद्वार जाहिराती लाऊन विद्रुप केले गेले आहे. लहान मुलांना खेळण्याच्या जागी वाळू नसल्याने पावसात चिखल झाला आहे. योगासाठी स्वतंत्र शेडची नागरिकांची मागणी असूनही पालिका त्याकडे डोळेझाक करत आहे. अनेकवेळा दिवेही बंद असतात.

सर्वात भयाण अवस्था लागूनच असलेल्या सचिन तेंडुलकर मैदानाची झालेली आहे. या ठिकाणी दिवस - रात्र मद्यपी व व्यसनींचा राबता असतो. पालिकेने बसवलेला रखवालदार तर कूचकामी ठरला आहे. येथे खेळण्यासाठी येणारी मुलेच मैदानातील दारूच्या बाटल्या उचलणे , दगड बाजूला करणे आदी कामे करतात.

पालिकेने बांधलेले स्वच्छतागृह तर अस्वच्छतेचे माहेरघर आहे. आत पाणी नसल्याने दुर्गंधी असते. आतील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. याआधीही महापालिकेने हिरवळीसाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. परंतु मैदानात कार्यक्रमांसाठी मंडप आदी टाकण्याची परवानगी पालिकाच देते.

मद्यपींबाबत पालिका व पोलिसांकडे सतत तक्रारी केल्या आहेत. मैदानात ४२ लाख खर्चूनही गवत नसल्याची तक्रार आयुक्त्तांकडे केली आहे. प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही तर शेवटी पालिकेवर मोर्चा काढू आणि आयुक्तांच्या दालनात मुले खेळतील.
- नीलम ढवण, नगरसेविका
रहिवाशांना एकही उद्यान व मैदान नव्हते. आपण पाठपुरावा करून ते पालिकेमार्फत करुन घेतले. त्यात माझा नगरसेवक निधीही दिला आहे. दैनंदिन देखभाल व सुरक्षेसाठी आपण पालिकेला नेहमीच तक्रारी केल्या आहेत. परंतु पालिका आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
- दिनेश नलावडे, नगरसेवक

Web Title: Sachin Tendulkar becomes the alcoholic in the Bhaindar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.