नाल्याच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुखरुप सुटका

By जितेंद्र कालेकर | Published: December 1, 2022 08:51 PM2022-12-01T20:51:50+5:302022-12-01T20:52:16+5:30

ठाणे आपत्ती व्यवस्थापनसह अग्निशमन दलाचे मदतकार्य

Safe rescue of pregnant cow trapped in drain chamber | नाल्याच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुखरुप सुटका

नाल्याच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुखरुप सुटका

Next

ठाणे: माजीवाडा, जय भवानी नगर येथील गणपती कारखान्याच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या दहा फूट खोल चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुटका करण्यात ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकांना गुरुवारी यश आले. तब्बल अडीच ते तीन तासांच्या परिश्रमानंतर तिची सुटका झाल्यामुळे या गायीचे मालक तानाजी शिंदे यांच्यासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

माजीवडा भागातील जय भवानीनगर भागातील एका नाल्याच्या चेंबरमध्ये गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एक गर्भवती गाय अडकल्याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्याच आधारे बाळकुम अग्निशमन केंद्रातील जवानांसह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी हे एका जेसीबी मशीनसह दाखल झाले.

त्यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका खासगी हायड्रा मशीनच्या मदतीने या गायीची सुखरुप सुटका केली. ब्रह्मांड पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली असून तिची प्रकृती उत्तम असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांिगतले.

Web Title: Safe rescue of pregnant cow trapped in drain chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे