अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

By अजित मांडके | Published: October 19, 2022 10:38 PM2022-10-19T22:38:21+5:302022-10-19T22:38:46+5:30

स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली.

Safe rescue of the trapped child | अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

Next

ठाणे :

स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली. तर अग्निशमन दलाने काही तासातच रूमचा दरवाजा तोडून त्या चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. 

डवले,खर्डी नाका, दिवा-शीळ रोड, खर्डीपाडा येथे आशापुरा सिंफनी ही तळ अधिक १२ मजली इमारत आहे. या इमारतीत सातव्या मजल्यावर तळेकर कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी अथर्व हा घरात असताना त्याने अचानक रूम मधील बेडरूमच्या दरवाज्याची कडी लावली. त्यानंतर त्याला ती उघडता येत नसल्याने तो अडकला होता. ही माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तसेच रूमचा दरवाजा  तोडून त्याची सुखरूप सुटका करत त्याच्या आईच्या ताब्यात दिले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Safe rescue of the trapped child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे