जिल्हा परिषद निवडणूकीत भिवंडीत काँग्रेसने खाते उघडले खोणी गटातील उमेदवार सगीना नईम शेख बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:03 PM2017-12-04T22:03:48+5:302017-12-04T22:11:08+5:30

भिवंडी तालुक्यात २१ जिल्हा परिषद गट व ४२ पंचायत समिती गणाच्या निवडणूका १३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भिवंडीतील खोणी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या.

Sagina Naeem Sheikh unanimously elected Khoni group candidate in Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणूकीत भिवंडीत काँग्रेसने खाते उघडले खोणी गटातील उमेदवार सगीना नईम शेख बिनविरोध

bhiwandikhoni

Next
ठळक मुद्देखोणी गटातील सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने खोणी गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख बिनविरोध निवडून आल्या.

जिल्हा परिषद निवडणूकीत भिवंडीत काँग्रेसने खाते उघडले
खोणी गटातील उमेदवार सगीना नईम शेख बिनविरोध
भिवंडी - ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी भिवंडी तालुक्यातील खोणी गटातील सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने खोणी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या.मात्र त्यांची विजयाची अधिकृत घोषणा १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून होणार आहे.
सध्या तालुक्यात २१ जिल्हा परिषद गट व ४२ पंचायत समिती गणाच्या निवडणूका १३ नोव्हेंबर रोजी होत आहेत.सर्वच गट व गणांत शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. त्यापैकी अल्पसंख्यांक बहुल असलेल्या खोणी जिल्हा परिषद गटात काँग्रेसतर्फे निवडणूक लढणाºया सगीना नईम शेख यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी आज सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी अचानक आपली उमेदवारी माघार घेतल्याने सगीना शेख बिनविरोध निवडून आल्या.या निमीत्ताने गेल्या बावीस वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसने खाते उघडल्याची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात पसरली आहे.जिल्हा परिषद गटात बिनविरोध उमेदवार निवडून यावा यासाठी काँग्रेसचे स्थानिक उमेदवार प्रयत्नशील होते.या गटासाठी भाजपा व शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता.तर राकाँपाने काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला होता.तसेच या गटात समाजवादी पक्षाने उमेदवारी करण्याची तयारी केली होती. परंतू त्यानंतर भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.परंतू निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संतोष थिटे हे १४ डिसेंबर रोजी हा निर्णय अधिकृतरित्या जाहिर करणार आहेत.काँग्रेसच्या उमेदवार निवडून आणण्याकरीता काँग्रेसचे ठाणे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे आणि ग्रामिण पदाधिकाºयांनी प्रयत्न केले.

Web Title: Sagina Naeem Sheikh unanimously elected Khoni group candidate in Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.