खडकावर आदळून ‘साई कृपा’ बुडाली

By admin | Published: May 2, 2017 01:54 AM2017-05-02T01:54:43+5:302017-05-02T02:58:59+5:30

वडराई खाडीतील धोकादायक खडक आणि सॅन्ड बार चा फटका ठकसेन तांडेल ह्यांच्या ‘साई कृपा’ ह्या मच्छिमार नौकेला बसून तिला

'Sai Kripa' fell down on the rock; | खडकावर आदळून ‘साई कृपा’ बुडाली

खडकावर आदळून ‘साई कृपा’ बुडाली

Next

पालघर : वडराई खाडीतील धोकादायक खडक आणि सॅन्ड बार चा फटका ठकसेन तांडेल ह्यांच्या ‘साई कृपा’ ह्या मच्छिमार नौकेला बसून तिला जलसमाधी मिळाली. ह्यात नौका मालकाचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असून स्थानिक मच्छीमारांनी मोठ्या प्रयत्नाने ही नौका पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
वडराई च्या खाडीतील गाळ काढून आणि धोकादायक नौकानयन मार्गातील धोकादायक खडक काढणे, दीपस्तंभ उभारणे, उधानाच्या पाण्याने वाहून गेलेली जेट्टीची दुरुस्ती करण आदी सोयीसुविधा निर्माण करून घ्याव्यात अशी मागणी वडराई मच्छीमार सहकारी संस्थेने अनेक वर्षांपासून शासनाकडे केली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मानेन्द्र आरेकर ह्यांनी दिली. आज ५० ते ६० मच्छिमार नौकाद्वारे मासेमारी केली जात असून बोंबील, कोळंबी ह्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मात्र, मच्छिमारांच्या प्रति आतापर्यंत उदासीन धोरण शासन स्विकारीत आल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसत आहे.
वडराई मच्छिमार संस्थेचे सभासद असलेले ठकसेन दाजी तांडेल ह्यांच्या मालकीची नौका खाडीत नांगरून ठेवली असताना खाडीतील चिखलमिश्रित गाळात रु तून बसली होती. ह्यावेळी समुद्राला मोठी भरती आल्याने गाळात रु तून पडलेली नौका बाहेर न निघाल्याने भरतीच्या पाण्याने बुडू लागली. स्थानिक मच्छीमारांनी माठ्या प्रयत्नाने ही नौका काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरली. ह्या अपघातात नौकेतील इंजिन मध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत. मच्छीमारीसाठी ठेवलेले साहित्य भिजून गेले. त्यामुळे संस्थेने शासनाकडे केलेल्या मागणी ची तात्काळ पूर्तता करावी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चेअरमन आरेकर ह्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sai Kripa' fell down on the rock;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.