सीसीटीव्हीमुळे आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:41 PM2017-07-29T23:41:57+5:302017-07-29T23:42:48+5:30
बँकेत जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना लुबाडणाºया आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अरुण देड्डा यास महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण :मुंबई उपनगरांत नागरिकांना लुबाडून ही टोळी आंध्र प्रदेशात जात होती आणि पुन्हा मुंबई उपनगरांत येत होती. म्होरक्याला अटक झाल्याने उर्वरित आरोपीही लवकरच जेरबंद होतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.
बँकेत पैशांचे व्यवहार करणाºया नागरिकांवर बँकेबाहेर उभे राहून हे चोरटे पाळत ठेवत होते. कल्याण-डोंबिवली परिसरात बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाºया नागरिकांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलीस त्याचा तपास करत होते. ज्या बँकेच्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या, तेथील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. त्या वेळी फूटेजमध्ये एक तरुण बँकेबाहेर दिसला. मात्र, त्याच्या हातात बँकेची स्लिप अथवा पासबुक दिसले नाही. त्याआधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तो अन्य एका बँकेच्या बाहेर उभा होता. त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली असता तो एका नागरिकावर लक्ष ठेवून असल्याचे दिसले. हा तरुण अचानक रांगेतून बाहेर पडला. पोलिसांनी त्याचा माग घेतला. त्याचे अन्य साथीदार पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक असलम खतीब यांनी सहकाºयांच्या साहाय्याने देड्डा याला पकडले. तो मूळचा आंध्र प्रदेशातील आहे. त्याचे अन्य साथीदार कांबळे, चड्डी आणि देवा हे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा माग घेत आहेत.
अजूनही लूटमारीच्या घटना सुरूच
डोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथ येथील रहिवासी अर्जुन सावंत हे एक लाखाची रोकड घेऊन कॉर्पाेरेशन बँकेत भरण्यासाठी जात होते. त्या वेळी एकाने भूलथापा देऊन त्यांच्याकडील एक लाखाची रोकड लुबाडली.
अन्य एका घटनेत पश्चिमेतील शास्त्रीनगरातील रितेश शहा हे बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना एकाने त्यांना भूलथापा देत त्यांच्याकडील ९६ हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.