शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:50 AM2017-07-29T01:50:59+5:302017-07-29T01:51:02+5:30

इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कआणि संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

saivasaenaenae-thaanayaata-karauuna-daakhavalae | शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले!

शिवसेनेने ठाण्यात करून दाखवले!

Next

ठाणे : इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्कआणि संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
महापौर मीनाक्षी शिंदे या वेळी अध्यक्षस्थानी असतील. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार सुभाष भोईर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजता ‘सिद्धांचल’ येथील वर्किंग वुमेन्स हॉस्टेलच्या भूमिपूजनाने होणार आहे. ६ कोटी ७५ लाखांचा खर्च करून बांधण्यात येणाºया या हॉस्टेलमध्ये १५५ महिला राहू शकतील, एवढी क्षमता आहे. त्यानंतर, २७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाºया इनडोअर जिम्नॅशियम सेंटरचे भूमिपूजन होणार आहे. येथे प्रशिक्षण केंद्र, योगा कक्ष आणि ३०० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आदी सुविधा असतील.
कोलशेत रोडला टीडीआरच्या माध्यमातून बांधण्यात येणाºया ९० कोटी खर्चाच्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचेही भूमिपूजन होईल. २०.५ एकर जागेत हे पार्कबांधण्यात येणार असून तेथे मुलांसाठी खेळण्याची जागा, थीम उद्यान, तलाव, क्र ीडा क्षेत्र, आयकॉनिक पूल आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

Web Title: saivasaenaenae-thaanayaata-karauuna-daakhavalae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.