वणवा समता परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, समाज मंदिराचे बांधकाम रेतीऐवजी ग्रीटनं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 06:26 PM2020-12-28T18:26:41+5:302020-12-28T18:27:09+5:30
उल्हासनगरात समाजमंदिराचा प्रश्न मनसेने ऐरणीवर आणल्यावर महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सदस्य व वणवा समता परिषदेचे निलेश पवार यांनी प्रभाग क्रं-१८ मध्ये दलित वस्ती निधीतून बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
उल्हासनगर : प्रभाग क्रं-१८ मध्ये समाजमंदिराचे काम रेती ऐवजी दगडाचे बारीक ग्रीटने होत असल्याचा आरोप वणवा समता परिषदेचे निलेश पवार यांनी महापालिकेकडे केली. तसेच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडे घालून निकृष्ट कामाबाबत त्यांचे लक्ष वेधले.
उल्हासनगरात समाजमंदिराचा प्रश्न मनसेने ऐरणीवर आणल्यावर महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सदस्य व वणवा समता परिषदेचे निलेश पवार यांनी प्रभाग क्रं-१८ मध्ये दलित वस्ती निधीतून बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रेती ऐवजी दगडाचा बारीक चुरा ग्रीटने समाजमंदिराचे काम सुरू असल्याची तक्रार महापालिका बांधकाम विभागाकड़े करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. समाजमंदिराघे काम धोकादायक झाल्यास, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. निकृष्ट होणाऱ्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडे घातले. तशी माहिती पवार यांनी पत्रकारांना दिली. याबाबत महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. बातमीला फोटो आहेत