शिक्षिकेची चार वर्षांपासून वेतनश्रेणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:51 AM2017-08-03T01:51:52+5:302017-08-03T01:51:52+5:30

येथील लाहोटी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीने विद्यालयातील शिक्षिका मंदाकिनी हिले यांची चार वर्षापासूनची वेतनश्रेणी रखडली आहे.

The salary class has been retired for four years from the teacher | शिक्षिकेची चार वर्षांपासून वेतनश्रेणी रखडली

शिक्षिकेची चार वर्षांपासून वेतनश्रेणी रखडली

Next

अनगाव : येथील लाहोटी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीने विद्यालयातील शिक्षिका मंदाकिनी हिले यांची चार वर्षापासूनची वेतनश्रेणी रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी लेखी आदेश देऊनही शालेय शिक्षण समितीने त्याची अंमलवजावणी न करता शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
१९९२ ते ९५ पर्यंतची वेतनश्रेणी दिलेली नाही. या विद्यालयात १९८० पासून हिले या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या नियमानुसार वेतनश्रेणी देण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांना बंधनकारक आहे. असे असतानाही त्यांना डावलण्यात आले. त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने वेतनश्रेणी देण्यासंबंधी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांना सूचना केल्या.

Web Title: The salary class has been retired for four years from the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.