ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:03 PM2018-04-05T16:03:32+5:302018-04-05T16:03:32+5:30

शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी

salary of teachers in thane district will be done through the district central bank | ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील खासगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

यापूर्वी १४ जून २०१७ च्या निर्णयान्वये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेऐवजी टीजेएसबी बँकेमार्फत वेतन करण्यास मान्यता दिली होती. मात्र २१ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल केला. त्यामुळे आता वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत होईल. आपली वैयक्तिक खाती कोणत्या बँकेत उघडायची याचे मात्र शिक्षकांना स्वातंत्र्य राहील.

Web Title: salary of teachers in thane district will be done through the district central bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.